DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी : अकील शहा
साक्री : साक्री तालुक्यातील वरपाडा येथे पित्यावर पुत्रावर प्राणघातक हल्ला करीत जीव ठार मारण्याची घटना घडली आहे
सविस्तर वृत्त:- गावात रिकामा फिरू नको काहीतरी काम धंदा कर असे सांगितल्याच्या रागातून पुत्राने थेट पित्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला काल मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी पुत्राला अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरपाडा येथील चिमण चैत्राम ठाकरे (वय ५५) असे जखमी पित्याचे नाव आहे त्यांनी मुलगा महेंद्र ठाकरे (वय ३०) यास तू गावात नुसता रिकामा फिरत असतो काहीतरी काम धंदा करीत नाही ,काहीतरी काम धंदा कर असे समजावून सांगितले होते त्याचा राग मनात ठेवून महेंद्र याने काल मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास वडील चिमण ठाकरे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने कुऱ्हाडीने डोक्यावर वार केला त्यात ते गंभीर जखमी झाले ही बाब गावातील नागरिकांच्या लक्षात येतात त्यांनी धाव घेऊन जखमी चिमण ठाकरे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले तर या प्रकरणी चिमण ठाकरे यांच्या फिर्यादीवरून पुत्र महेंद्र ठाकरे विरोधात भादंवी ३०७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे एपीआय हनुमंत गायकवाड करीत आहेत.