DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी- राहुल राठोड
पिंपळनेर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेनेच्या धोरणास अनुसरून ८०% समाजकारण व २०% राजकारण या धोरणात्मक विषयांने शिव आरोग्य सेनेचे जिल्हा संघटक मयुर भाऊ नांद्रे यांच्या वतीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पिंपळनेर शहरातील व तालुक्यातील नागरिकांना आयुष्यमान भारत (आभा कार्ड) चे वितरण ना नफा ना तोटा या तत्त्वावर वितरण करण्यात येत असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना जिल्हा समन्वयक किशोर आप्पा वाघ, शिवसेना उप जिल्हाप्रमुख हिम्मत भाऊ साबळे, शिव आरोग्य सेना जिल्हा सह समन्वयक हिम्मत सोनवणे, शिवसेना तालुका समन्वयक ज्ञानेश्वर पगारे, उप तालुका प्रमुख तुषार गवळी, पिंपळनेर शहर प्रमुख महेश वाघ, शहर प्रमुख कृष्णकांत पुराणिक, शहर समन्वयक उदय बिरारी, शहर संघटक अतुल चौधरी, विभाग प्रमुख भाऊसाहेब पगारे, महिला आघाडी उपजिल्हा संघटिका अल्का ताई जाधव, शहर संघटिका अर्चना ताई चव्हाण, गोरक्षक शुभम सुर्यवंशी, किरण पवार, बाबा शेख, डि.टेक काँम्प्युटर संचालक दानिश शेख व सहकारी, शिव आरोग्य सेना, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, शिक्षक सेना व सर्व अंगीकृत संघटना, सर्व आजी माजी पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.