DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: महेंद्रसिंग गिरासे
शिंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील अलाने ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवत असते त्या निमित्ताने जिल्ह्यात आलाने ग्रामपंचायतीचे नाव चांगलेच लौकिक आहे. अलाने,आदर्श गाव उपक्रम अंतर्गत मंगळवारी अलाने ग्रामपंचायत तर्फे पहिली माहेरची साडी वितरित करण्यात आली त्या प्रसंगी सरपंच सौ.अरुणाबाई गिरासे व अलाने गावाचे मुंबई नगरीत नाव रोशन करणाऱ्या धडाकेबाज PSI मोनिया गिरासे आणि ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते.
त्याप्रसंगी PSI मोनिया यांनी सांगितले की अतिशय सुंदर उपक्रम अलाणे ग्रामपंचायत तर्फे राबविला जात आहे, त्यांचे मी अभिनंदन करते आणि महिलांनी अधिक सक्षम होणे पुढील काळाची गरज आहे.