(कर्जत:-जयेश जाधव)
महाराष्ट्र राज्य आणि रेड अण्ट यांच्या वतीने लाॅ विभागामध्ये करत असलेल्या कार्याबद्दल अॅड मंगेश मनोहर देशमुख यांना नुकताच “महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२३” या पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत पंचतारांकित हाॅलमध्ये स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मुंबई येथील पंचतारांकित हाॅलमध्ये IEMS(Honorary Doctorate Felicitation programme) तर्फे मानद डाॅक्टरेट कायदा मध्ये उत्तम कार्य करीत असल्याने मंगेश देशमुख यांना मुंबई येथील पंचतारांकित haytt centric juhu Mumbai येथे डाॅक्टरेट (law) सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री अदिती गोवित्रिकर व IEMS चे निर्देशक यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
या पुरस्काराबद्दल मंगेश देशमुख याचे कल्याण वकिल संघटनेचे वतीने वकील मित्रांनी कल्याण कोर्टात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.