DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: संदिप अहिरे
धुळे : दिनांक 1 फेब्रुवारी रोजी नाशिक येथे झालेल्या शालेय विभागीय ग्रापलिंग स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील खालील खेळाडू विजयी झाले असून, त्यांची राज्यस्तरीय ग्रापलिंग स्पर्धेसाठी यशस्वी निवड झाली आहे.
*विजयी खेळाडू*
शिवराज दुष्यंतराजे देशमुख
इच्छिता आनंद गावडे
हरीसिद्धी युवराज गिरासे
प्रेम प्रवीण कढरे
प्रशांत दिलीप कोळी
अभिषेक दादाभाऊ भील
राकेश गोकुळ खरे
कार्तिक मनोहर पाटील
पारस संभाजी मराठे
राजदिप दीपक खताळ
या सर्व विजय खेळाडूंना धुळे जिल्हा ग्रापलिंग असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे राजेन देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले.
तसेच धुळे जिल्ह्यातून प्रशिक्षक रोहित नेरकर, अमृत पाटील, कन्हैया माळी, पंकज राजपूत सर यांचे या खेळाडूंना प्रशिक्षण लाभले. हे सर्व विजयी खेळाडू नाशिक विभागाचे प्रतिनिधित्व राज्यस्तरीय ग्रापलिंग स्पर्धेसाठी करणार आहेत. सर्व विजय खेळाडूंना भावी वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन.