DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी : संदीप अहिरे
धुळे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, माजी सैनिक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने महाप्रबोधन यात्रेची सुरवात संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आलेली आहे. त्यानुसार काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माजी सैनिकांच्या प्रबोधन यात्रेचे आगगन धुळे जिल्ह्यात झाले. सदर यात्रेचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या वतीने राष्ट्रवादी काँगेस भवन, धुळे येथे जंगी स्वागत करण्यात आले.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलच्या वतीने राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रा सुरु करण्यात आलेली आहे. भाजपा व जातीय वादी पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचा वारंवार अपमान करीत आहेत. त्या विरोधामध्ये संत व महापुरुषांनी केलेल्या महान कार्याची माहिती देण्यासाठी राज्याव्यापी महाप्रबोधन यात्रा काढण्यात आलेली आहे. सदर यात्रेमध्ये अॅड.श्री.संभाजीराव जाधव, माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष श्री.दिपकराव शेळके, बाबासाहेब जाधव आदी यात्रेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक घेवून महापुरुषांची महंती, त्यांनी केलेले काम, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती पदाधिकारी व कार्यकत्र्यांना देण्यात आली. यावेळेस मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे धुळे शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले, जोसेफ मलबारी, प्रशांत भदाणे, महेंद्र शिरसाठ, महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या सौ.कल्पना महाले, नगरसेविका मंगलाताई चौधरी, शकीला बक्ष आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री.अमित शेख यांनी केले.
सदर कार्यक्रमाला डी.बी.पाटील, तावडे सर, डि.जे.मराठे, यशवंत डोमाळे, भिका नेरकर, राजेंद्र चौधरी, अॅड.तरुणा पाटील, दिपक देसले, विशाल केदार, रईस शेख, चेतन पाटील, तत्सवर बेग, रामेश्वर साबरे, ऋतिक पोळ, संजय माळी, बरकत शाह, जितू पाटील, फिरोद्दीन शाह, हेमंत पाटील, शोएब अन्सारी, शरीफ शाह, सोनू घारु, स्वामिनी पारखे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.