DPT NEWS NETWORK 🗞️✍️
दहिवेल प्रतिनिधी
राहुल राठोड
आज दि.23/02/2023 रो. महाराष्ट्र ग्राम पंचायत संगणक परिचालक यांच्या वतीने संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात म. गटविकास अधिकारी प. स. साक्री व तालुका समन्वयक assk प. स. साक्री यांना निवेदन देण्यात आले,
राज्यात 27000 ग्राम पंचायत संगणक परिचालक हे 6 कोटी जनतेला 2011 पासून विविध ऑनलाईन सुविधा देत आहेत व अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे असे असताना देखील संगणक परिचालक यांना अत्यंत अश्या तुटपुंज्या मानधन वर काम करावं लागतं आहे म्हणून संगणक परिचालक यांना यावलकर समितीच्या शिफारस नुसार संगणक परिचालक यांना ग्राम पंचायत सुधारित आकृती बंध मधे पद निर्मिती करून कर्मचारी दर्जा व किमान वेतन मिळणे आवश्यक आहे परंतु शासनाने अनेक वेळा लेखी व तोंडी आश्वासन देवून कोणताही ठोस निर्णय दिला नाही म्हणून विविध मागण्या मान्य करण्या संदर्भात दि.01 मार्च 2023 पासून मुंबई आझाद मैदान येथे राज्य संघटनेच्या वतीने मोर्चा निघणार आहे, तसेच दि.27 फेब्रू 2023 पासून काम बंद चे आंदोलन तालुका संघटनेच्या वतीने देण्यात आले, निवेदन देताना साक्री तालुका अध्यक्ष अंबालाल नेरकर उपाध्यक्ष विशाल साई सचिव प्रदीप भदाने, विनोद राठोड, साहेबराव कारंडे, रमेश सूर्यवंशी, कैलास जाधव, छोटीराम भोये, योगेश चव्हाण, शितल शेवाळे, वैशाली पानपाटील, लता शिंदे, आदी उपस्थित होते.