DPT NEWS NETWORK 🗞️✍️. प्रतिनिधी: नंदकिशोर मेश्राम. चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुंड महाकाली कॉलरी निवासी 30 वर्षीय अमित माखन गुप्ता वर चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने कारवाई करीत 2 वर्षासाठी चंद्रपूर जिल्हा कारागृहात स्थानबद्ध केले आहे.
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी 8 मार्च ला याबाबत आदेश जारी केले आहे.
अमित गुप्ता वर तब्बल 39 गंभीर गुन्हे दाखल असून यामध्ये प्राणघातक हल्ला करणे, दंगा करणे, गंभीर दुखापत करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला, जीवे मारण्याचा प्रयत्न, चोरी, ठार मारण्याची धमकी, महिलांचा विनयभंग, खंडणी मागणे, शासनाने लागू केलेल्या दारूबंदीचा आदेश झुगारून दारूविक्री व अवैध दारू तस्करी करणे, अनेक भागातील नागरिकांना धमकावीत दहशत निर्माण करणे अश्या अनेक गुन्हे गुप्ता वर दाखल आहे.
अमित गुप्ता वर याआधी जिल्हा प्रशासनाने कलम 110 अंतर्गत प्रतिबंधात्मक हद्दपारीची कारवाई केली होती मात्र त्यानंतर ही गुप्ता यांचे विघातक कृत्य सुरूच होते, त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने MPDA ACT अंतर्गत गुप्ता ला तब्बल 2 वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे.
सदरची महत्वपूर्ण कारवाई जिल्हाधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक रविंद्र सिंग परदेशी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर नंदनवार, पोलीस निरीक्षक राजेश मुळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश खरसान, मंगेश भोयर, पोउपनी अतुल कावळे, पोलीस कर्मचारी अरुण खारकर, मनोज रामटेके, सुधीर मत्ते, अनिल, गणेश भोयर व योगेश सोनवणे यांनी केली.