DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – संजय गुरव
शहादा: शहादा ते प्रकाश रोडवर वाहना़ंची राहदारी जास्त असल्याने नेहमी अपघात होत असतात. रविवारी सकाळी टेम्पो आणि ट्रक अश्या दोन वाहनांचा धडकेत तीन लोकांचा जागीच मृत्यु झाला आहे.
सकाळच्या सुमारास झालेल्या या धडकेचा आवाज घटना नजदीक असलेल्या लोकांसाठी भिती निर्माण करणारा होता. आवाज एकताच अनेक ज्ञात व अज्ञात लोक घटनास्थळी पोहोचलेत. टेम्पो व ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने टेम्पोचा पुढचा कँबीनचा भाग पुर्णपणे ट्रकमध्ये दाबला गेला व त्या कँबीनमध्ये बसलेल्या तिघांचा जागीच मृत्यु झाला. त्यांना त्वरीत आरोग्य केंद्रात पाठवण्यात आले.
सकाळी शहादाहून प्रकाशाकडे जाणारी मालवाहु टेम्पो प्रकाशा गावाजवळ कोकण मातेचा मंदीरा जवळ पोहोचली असता समोरुन येणाऱ्या भरधाव ट्रकवर धडकली. ट्रक भरधाव असल्याने टेम्पोचा पुढचा भागाचा पुर्ण पणे चक्काचुर झाला. या भयानक टक्कर मध्ये टेम्पोचा कँबीन मध्ये बसलेले तीन लोक चेपले गेले व जागेवरच त्यांचा मृत्यु झाला. टेम्पो व ट्रकचा धडकेत टेम्पो हे ट्रकमध्ये अडकल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी जे.सी.बी.ची मदत घ्यावी लागली. जे.सी.बी. यंत्राणेचा सहय्याने अडकलेल्या टेम्पोला बाहेर काढण्यात आले. दृश्य एवढे भयानक होते की बघणारे लोकांचा अंगावर शहारे येत होते. या भिषण अपघातामुळे वाहनांचा जाम लागला होता. काही त्यामुळे वाहनांची ट्रॅफिक पुर्णपणे ठप्प झालेली होती. स्थानिक ग्रामस्थ तसेच तत्काळ घटनेचा जागी पोहोचलेल्या पोलीस बांधवांच्या सहकार्याने रहदारी मोकळी करण्यात आली. जागेवरच मृत्यु झालेले लोकांचे नातेवाईक हे मध्यप्रदेश व सुरत चे असल्याने सांयकाळ उशीरा पर्यंत ते पोहोचु शकले नव्हते.
जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी भेट देउन पाहाणी केली तसेच सदर घटनेची चौकशीसाठी आवश्यक त्या सुचना दिल्या. उपविभागीय पोलीस अधीकारी श्रीकांत घुमरे तसेच सहा. पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनीही सदर घटनास्थळी जाउन तपासणी केली.
प्रकाशा पोलीस दुर क्षेत्राचे संदीप खंदारे व रामा वळवी यांनीही परिश्रम घेत राहदारी अस्तव्यस्त नको व्हायला यासाठी कार्य केले. जिल्ला परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सुरेश पाटील तसेच घटनास्थळी जमलेल्या ग्रामस्थांनी देखील मदत केली.
या भिषण अपघातानंतर ट्रक चालक व सह-चालक दोघही फरार झालेले आहेत.