DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (DMIC) बाबत समिती प्रमुख तथा शहर जिल्हाध्यक्ष श्री.रणजीत राजे भोसले यांनी श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांची मुंबईत भेट घेतली.
धुळे जिल्ह्याचा समावेश हा दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर प्रकल्पामध्ये करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्प लवकर व्हावा यासाठी कॉरिडॉर प्रकल्प विकास समिती ही गेल्या सात-आठ वर्षांपासून काम करीत आहे. सदर प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने दिनांक 03/02/2022 रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये प्रकरण 6 व कलम 2 खंड 2 (ग) लागू करण्यासाठी म्हणजे भुसंपादन करण्यासाठी जिल्ह्यातील प्रादेशिक अधिकारी, धुळे यांच्याकडून प्रस्ताव मागविण्यात आला होता. त्यानुसार शासनाकडे दिनांक 21/10/2022 रोजी मा.प्रादेशिक अधिकारी, धुळे यांनी जमीन अधिग्रहण करण्याचा प्रस्ताव मा.महाव्यवस्थापक मुंबई यांच्याकडे सादर केलेला आहे.
त्यासंदर्भात आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेवून श्री.रणजीत राजे भोसले यांनी प्रयत्न करण्याची विनंती केली. यावेळी शरद पवार साहेब यांनी प्रकल्पातील गावे, त्यांची संख्या, एकूण भूसंपादीत क्षेत्र, त्यांची किंमत, नियोजित जागा, त्यांचा नकाशा याबाबत सविस्तर माहिती घेतली.
धुळे कॉरिडॉर प्रकल्प (DMIC) बाबत प्रयत्न करतो. तसेच पुढच्या महिन्यात सर्व फाईल, नकाशे, परिपत्रक, आदेश यांची फाईल घेवून या. पुढील महिन्यात DMIC बाबत सरकारशी चर्चा करु असे शरद पवार साहेब यांनी सांगितले.
धुळे शहर व जिल्हयाचा समावेश दिल्ली-मुंबर्इ इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्प (DMIC) अंतर्गत करण्यात आलेला आहे. सदर प्रकल्पांला प्रांरभिक मंजूरी मिळाली आहे. या प्रकल्पांना परकीय गुंतवणूकीसाठी मदत होणार असून परकीय देश या ठिकाणी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे धुळे शहराचा चेहरा-मोहरा बदलणार आहे. शहराचा मोठ्या प्रमाणात विकास होवून रोजगार निर्मिती या ठिकाणी होणार आहे. धुळे शहरालगत दहा गावांच्या हद्दीतील 6 हजार हेक्टर (15 हजार एकर) जमीनीवर हा प्रकल्प साकारला जाणार आहे.
या भेटीबाबत श्री.रणजीत राजे भोसले यांनी समाधान व्यक्त केले. सदर प्रकल्पाबाबत लवकरच ठोस निर्णय लागेल असे रणजीत राजे भोसले यांनी कळविले आहे.