DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- अकिल शहा
साक्री : साक्री तालुक्यातील धमनार ते वसमार रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्या जखमी होऊन प्रचंड प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास घडली आहे.
धमनार ,म्हसदी, काळगाव,वसमार शिवारात मागील काही वर्षांपासून बिबट्यांचा वावर गाव शिवाराकडे होताना दिसत आहे ,बिबट्या रात्री पशुधनाची शिकार करण्यासाठी गावाकडे येत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे, शनिवारी रात्री जंगल शिवारातून शिकारीचा शोध घेत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती गावकऱ्यांकडून वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना देण्यात आली, घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी डी.आर.अड़कीने यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल डी.पी पगारे, एल.आर.वाघ व वन कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला, बिबट्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे अशी माहिती वन अधिकाऱ्यांकडून प्राप्त झाली आहे. बिबट्या हा नर जातीचा असून वन अधिकाऱ्यांकडून धडक देणाऱ्या वाहनाचा शोध सुरू आहे , घटनास्थळी वसमार गावाचे सरपंच समाधान येळीस, उपसरपंच भटू नेरे, सुशील नेरे, मच्छिंद्र नेरे, धमनार चे जितेंद्र खैरनार, संदीप खैरनार आदि घटनास्थळी उपस्थित होते.