नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बेपत्ता महिला अल्पवयीन मुली शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस राज्यात अव्वल क्रमांक….

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- प्रविण चव्हाण

नंदुरबार -: मागील पाच वर्षांत नंदुरबार जिल्ह्यातून 274 अल्पवयीन मुली- 1278 महिला बेपत्ता झाल्या असून त्यापैकी नंदुरबार जिल्हा पोलिसांनी 1207 महिला व 263 अल्पवयीन मुलींच्या शोध घेतला आहे.
बेपत्ता झालेल्या महिला अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यातही नंदुरबार जिल्हा पोलीस राज्यात अव्वल क्रमांक आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस गुन्हे बैठकीत जिल्ह्यातील मालमत्तेविरुध्द्चे घरफोडी, चोरी इत्यादी गुन्ह्यांचा गुन्हे आढावा दरमहा घेण्यात येत असतो. नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे हद्दीत सन 2018 ते सन 2022 या पाच वर्षाच्या कालावधीत एकुण 1278 महिला बेपत्ता व 274 अल्पवयीन मुलींचे अपहरण करुन पळवून घेवून गेल्याचे गुन्हे दाखल होते. त्यापैकी काही बेपत्ता झालेल्या महिला व अपहरणाच्या गुन्ह्यातील पिडीत मुली अद्यापही मिळून आलेल्या नाही. त्याअनुषंगाने अशा गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन बेपत्ता झालेल्या महिला, अपहरण करुन पळवून घेवून गेलेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेणे बाबत विशेष मोहिम राबवून जास्तीत जास्त बेपत्ता महिला व अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलींचा शोध घेणे बाबत नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.

मा. पी. आर. पाटील
पोलीस अधिक्षक (नंदुरबार)


पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य मुंबई यांचेकडील आदेशान्वये दिनांक 1 जुन 2021 पासुन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पोलीस नियंत्रण कक्षात मिसिंग डेस्क तयार करण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस नियंत्रण कक्ष येथे मिसिंग डेस्क स्थापन करण्यात आला असून नियंत्रण कक्षाच्या मार्फतीने पोलीस ठाण्यात संपर्क करुन पोलीस ठाणे स्तरावर दाखल बेपत्ता बालके, महिला व पुरुष यांचे नातेवाईक तसेच प्रभारी अधिकारी व बेपत्ता प्रकरणातील तपासी अधिकारी यांना दररोज संपर्क करुन बेपत्ता इसमाबाबत माहिती घेवुन ते मिळुन येण्याकरीता प्रयत्न केले जातात.
या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाणे मधील 01 पोलीस अधिकारी व 02 पोलीस अंमलदार असे एकुण 12 पोलीस अधिकारी व 24 पोलीस अंमलदारांचे पथक पोलीस ठाणे स्तरावर तयार करण्यात आलेले होते. स्थापन करण्यात आलेल्या पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सन 2018 ते सन 2022 या पाच वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रासह, गुजरात व मध्य प्रदेश राज्यात जावून बेपत्ता झालेल्या 1278 महिलांपैकी 1207 व 274 अल्पवयीन मुलींपैकी 263 अल्पवयीन मुलींना शोधण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलास यश आले आहे.
अपहरणाच्या गुन्ह्यांतील शोध न लागलेल्या मुलींचा शोध घेण्याकरीता नंदुरबार पोलीस अधीक्षक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय येथे अनैतिक मानवी वाहतूक व्यापार कक्ष स्थापन करण्यात आला असून सदर कक्षाकडून अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात येत असतो. मागील दोन वर्षात सन 2017 पासून शोध न लागलेल्या 14 अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात अनैतिक मानवी वाहतूक कक्षाला यश आले आहे.
अपहरणाच्या दाखल गुन्ह्यात तपासा दरम्यान असे निदर्शनास आले आहे की, यातील 13 ते 18 वर्षे वयोगटाच्या बऱ्याच अल्पवयीन मुलींना फूस लावून ओळखीच्या व्यक्ती बरोबर घरातून निघून गेल्याचे समजून आले आहे.
सदर मुलींचे देह व्यापार, शरीर विक्री, अंमली पदार्थ किंवा गुन्हेगारांच्या टोळीत सहभागी होवू नये यासाठी अनैतिक मानवी वाहतूक व्यापार कक्षाकडून सदर मुलींचा लवकरात लवकर शोध घेवून त्यांना त्यांच्या पालकांचा ताब्यात देण्यात येत असते.
नंदुरबार जिल्ह्यात अल्पवयीन मुलींचे अपहरण व बेपत्ता झालेल्या महिलांचा शोध घेण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा सतर्क करण्यात आली आहे. सदर अल्पवयीन मुलींचे व महिलांचे तस्करी होवू नये व त्या लवकरात लवकर त्यांचा शोध लागावा यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालय येथे विशेष Anti Human Traffiking Unit ची स्थापना करण्यात आली आहे.
बेपत्ता महिला व अल्पवयीन मुली यांचा शोध घेण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस नेहमी प्रथम प्राधान्य देवून काम करीत आहे.
गुन्हे तपासा बरोबरच अल्पवयीन मुली, महिला यांचा शोध घेण्याकरीता सचोटीने प्रयत्न करणे बाबत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे.
अशी माहिती पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी दिली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:10 pm, January 13, 2025
temperature icon 24°C
साफ आकाश
Humidity 41 %
Wind 13 Km/h
Wind Gust: 15 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!