नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

‘११२’ वर एक कॉल अन् गडचांदूर पोलिसांची तत्परता

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- नंदू मेश्राम

चंद्रपूर: बसमधून बॅग हरविल्याची तक्रार ११२ वर प्राप्त होताच गडचांदूर पोलिसांच्या तत्परतेने अवघ्या काही तासांतच त्या तरुणाला त्याची बॅग परत मिळाली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. योगेश पुट्टावार (रा. नांदा, ता. कोरपना) हा युवक २४ मे रोजी सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान बसने प्रवास करताना त्याची बॅग हरवली. त्याने तत्काळ ११२ या पोलिसांच्या हेल्पलाइनवर कॉल करून आपली बॅग चोरीला गेली, बॅगेत दोन हजार रुपये रोख तसेच क्रीडा प्रमाणपत्र असल्याचे सांगितले. सीएसएफ मुंबई येथे कॉल गेल्यानंतर तो डायल ११२ प्रकल्प चंद्रपूरशी जोडण्यात आला. यावेळी त्याला घटनेची हकिकत विचारली. ही घटना गडचांदूर पोलिस स्टेशन हद्दीतील असल्याचे समोर आले. त्यांनी लगेच डायल ११२ प्रतिसादक पोलिस अंमलदार पोलिस हवालदार धर्मेंद्र रामटेके व पोलिस अंमलदार राहुल बनकर यांना माहिती देऊन बस स्टॉप चौक गडचांदूर येथे शोधकामी पाठविले. यावेळी बस क्रमांक एमएच १४ एचबी ८८२३ या
बसची तपासणी केली असता, त्या बसमध्ये तक्रारदाराची बॅग मिळून आली. पोलिस अंमलदारांनी योगेश पुट्टावार याला बोलावून त्याला बॅग सुपुर्द केली. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:55 am, January 13, 2025
temperature icon 18°C
साफ आकाश
Humidity 57 %
Wind 5 Km/h
Wind Gust: 5 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!