DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय गुरव
शहादा: शहादा तालुक्यातील गणोर येथे नरभक्षक बिबट्याने एका बालिकेवर हल्ला केला त्यात ती गंभीर जखमी झाली असून दुसऱ्या दिवशी देखील गावातील शेळ्यावर हल्ला करीत एक शेळी फस्त केली तर सलग तिसऱ्या दिवशी पुन्हा एका तरुणावर हल्ला करीत जखमी केल्याची घटनेने परिसरात भीतीचे वातावरण तयार केलेले आहे.
साविस्त वृत्त असे की बुधवारी सायंकाळी सातच्या दरम्यान संध्या रामजीनाथ निकम वय आठ वर्षे ही आपल्या आईसोबत शौचास जात असताना अचानक आईच्या डोळ्यासमोर बिबट्याने संध्यावर हल्ला केला. तिच्या पायाला बिबट्याने पकडल्याने बिबट्याने मुलीवर हल्ला केला हे पाहतच आईने आरडा ओरड करीत बिबट्याने संध्याला सोडून तेथून पळ काढला. संध्या जखमी झाली लागलीच प्राथमिक उपचार करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पुन्हा बिबट्याने गणोर गावातील एक ठिकाणी बांधण्यात आलेल्या शेळ्यांचा कळपावर हल्ला चढविला त्यात एक शेळी फस्त केली असून दुसरी शेळी जखमी झाल्याची घटना घडली यामुळे गणोर गावात दहशतीचे वातावरण निर्माण झालेले असून वन विभागाने तात्काळ मोठी दुर्दैवी घटना घडण्याची वाट न पाहता संबंधित विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे बसवलेले आहेत.