DPT NEWS NETWORK 🗞️✍️
अक्कलकुवा प्रतिनिधी
अक्कलकुवा :- धडगाव ग्रामीण रुग्णालया मध्ये आज जागतिक सिकलसेल दिवसा निमित्ताने ग्रामीण रुग्णालय धडगाव येथे आज दिनांक. ०१/०७/२०२३ रोजी डॉ. वानखेडे वैद्यकीय अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सिकलसेल हा दिवस आज उत्साहात साजरा करण्यात आला होता.
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, अनिल वळवी यांनी सिकलसेल या आजरा विषयी माहिती दिली. आणि सिकलसेल आजार हा नुवंशिक असून असे विवाह न करण्या विषयी मार्गदर्शन केले. आणि संतोष पावरा प्रयोगशाळा सहाय्यक, तसेच अशोक पावरा हिंदलॅब यांनी सिकलसेल या आजाराची तपासणी करण्यात आली.
यावेळी रुग्णांना लाल, पिवळे, पांढरे, कार्ड देण्यात आले होते. यावेळी महिला वर्ग, धडगाव ग्रामीण रुग्णालय मधील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.