DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
साक्री : नागपूर -सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरती वसलेल्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शेवाळी (दा.) गावावरून राज्य परिवहन महामंडळाच्या काही बसेस गावावरून न जाता बायपास मार्गे जात असल्याने गावकरी व प्रवाशांचे अतोनात हाल होताना दिसत आहे, जुन्या मार्गाने गावात थांबा असताना सुद्धा व शासन निर्णयानुसार सर्व प्रकारच्या (जलद, अती जलद,) बसेस बायपास मार्गे न जाता गावाकडील जुन्या मार्गाने वाहतूक करावी तरी सुध्दा काही बस चालक बस बायपास मार्गे वाहतूक करीत असल्याची तक्रार गावकरी करीत आहेत त्यांच्यात विशेषता वृद्ध व्यक्ती ना जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे कारण की, बाहेरगावावरून येत असताना त्यांच्याकडे काही प्रमाणात बॅगा, पार्सल असते अशा वेळी त्यांना एवढ्या लांबून गावाकडे येण्यासाठी चालत येत असताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे अशावेळी जर एखादा वृद्ध व्यक्ती चक्कर येऊन पडला तर त्याला जबाबदार कोण राहील असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करीत आहेत अशावेळी साक्री बस आगाराचे आगार व्यवस्थापक यांनी या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन सर्व चालक यांना सूचना द्याव्यात व तसेच इतर आगारांना पत्र पाठवून सर्व आगाराच्या शेवाळी गावावरील जुन्या मार्गानेच बसेस ची वाहतूक करावी अन्यथा गावकरी राज्य परिवहन महामंडळाच्या विरोधात जन आंदोलन करतील असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.