DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकील शहा
धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील रहिवासी विठ्ठल एलजी सोनवणे यांच्या दोन्ही कन्या एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी पदावर विराजमान झाले आहेत यात मोठी मुलगी नम्रता सोनवणे पीएसआय तर लहान मुलगी जयश्री सोनवणे एलआयसी विकास अधिकारी वर्ग 2 या पदावर विराजमान झाल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नम्रता व जयश्री या दोन्ही भगिनींनी यश प्राप्त केले आहे, जिद्द व चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी यश मिळवले असून त्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल भामेर गावात वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली या वेळी निजामपूर पोलीस स्टेशनचे एपीआय हनुमंत गायकवाड, शिवसेना शाखाप्रमुख विश्वनाथ सोनवणे, भामेर गावाचे सरपंच मनोज सोनवणे व तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.