DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रा. भरत चव्हाण
तळोदा-: तालुक्यातील आमलाड ते बहुरूपा गावाजवळ तब्बल ७ लाखाचा अवैध मद्यसाठा तळोदा पोलीसांनी जप्त करून ताब्यात घेतला.
रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
तळोदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना आमलाड ते बहुरूपा दरम्यान मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली.
त्या माहितीच्या आधारे दुपारी ४ वाजेच्या सुमारास पोलीसांनी सापळा रचला त्यावेळी एका वाहनातून सुमारे ७ लाखांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार बागुल, सपोनि अविनाश केदार, सागर गाडीलोहार,पुना पाडवी, पोना अजय पवार,पोना विलास पाटील, विजय जावरे, पो.शि.संदीप महाले,महिला एएसआय संगिता बाविस्कर यांच्या पथकाने केली.
चालक आयशर गाडी सोडुन फरार झालेला आहे.
याविषयी तळोदा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.