DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी – संजय गुरव
नंदुरबार: शहरातील विविध भागात उघड्यावर मांसविक्री सर्रास सुरू असून, त्यामुळे परिसरात रोगराई पसरत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह लहान मुले आजारी पडत आहे. आता हिंदूंचा पवित्र अधिक-श्रावण मास, जैनांच्या चातुर्मास सुरू होत आहे, यासाठी नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील उघड्यावरील मांसविक्री आणि चिकन- मटणाचा लॉऱ्या तात्काळ बंद करण्याची मागणी हिंदु सेवा सहाय्य समिती, पुरोहित संघ, विविध मंदिराचे पुजारी आणि जैन संघाने निवेदनाद्वारे पोलीस अधीक्षक पी आर पाटील, आरोग्य अधिकारी विशाल कांबळी यांच्याकडे केली.२५जुलैपर्यंत कारवाई न केल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, हिंदूंचा पवित्र अधिक-श्रावण मास, जैनांच्या चातुर्मासया महिनांमध्ये उपासनेला अनन्य साधारण महत्व आहे. ज्यावेळी हिंदु समाजातील लोक मंदिरात जातात त्यावेळी चौका चौकात आणि गल्लीबोळात अवैधरित्या उघड्यावर मांस विकणारे यांचा दुकानांमध्ये मांसाचे तुकडे लटकलेले पाहायला मिळतात त्यामुळे भावना दुखत असल्याने उघड्यावरील मांसविक्री तत्काळ बंद करणे आवश्यक आहे. कायद्यानुसार उघड्यावर मांसविक्री करण्यास बंदी असतांना यापुर्वी वेळोवेळी निवेदन देवून सुध्दा त्याची अंमलबजावणी होतांना दिसून येत नाही. यापूर्वीही आम्ही या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी आमरण उपोषण केले त्यावेळी प्रशासनाने तात्पुरती नोटीस देणे, दंडात्मक कारवाई केली, परंतु दंडाची रक्कम थोडीच असल्याने अवैधपणे मांसविक्री करणारे ती रक्कम भरून पुन्हा आपला व्यवसाय थाटतात. त्यामुळे या अवैध व्यवसायावर आळा बसत नाही. तरी जे विक्रेते नोटीस, दंडात्मक कारवाईला जुमानत नसतील त्यांची दुकाने सील करून जप्तीची कडक कारवाई करावी. फूड सेफ्टी स्टॅण्डर्ड ऍक्ट 2011 नुसार उघड्यावर मांस विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे असे असतांना उघड्यावरील मांसविक्री आणि त्यापासून विविध पदार्थ बनवून विक्री करणार्या अनधिकृत गाड्या यांच्यावर त्वरित कठोर कारवाई करून त्या कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. प्रशासनाकडून २५ जुलै पर्यंत अवैध मांस विक्रेत्यांवर कठोर कारवाई न झाल्यास आंदोलन-उपोषणाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला. निवेदनावर
नरेंद्र पाटील, मोहन जैन, प्रदीप भट, रवी जैन, प्रमोद जोशी, संतोष देवळालिंकर, पंकज त्रिवेदी, दिनेश पाठक, संतोष जैन, जयेश भोई, आकाश गावित, पंकज डाबी, गणेश राजपूत, जितेंद्र मराठे, उज्वल राजपूत आदी उपस्थित होते.