DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अजगरभाई मुल्ला. जळगाव :- अघोरी पुजा करुन गुप्तधनाचा शोध करणाऱ्या टोळीस चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी शिताफीने ताब्यात घेतले.
दिनांक 15/07/2023 रोजी चे 23/00 ते दिनांक.16/07/2023 रोजी सकाळी 05/00 वा दरम्यान एम राजकुमार पोलीस अधिक्षक जळगांव, यांच्या आदेशाने व रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव तसेच अभयसिंग देशमुख, सह्हायक पोलीस अधिक्षक चाळीसगांव भाग चाळीसगांव यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव शहरात पोलीस स्टेशन हद्दीत आषाढी आमावस्या निमित्त सक्त रात्रगस्त पेट्रोलिंग करण्याची मोहीम राबविण्यात आली होती.
वरीष्ठाच्या आदेशाने पोलीस स्टेशन हद्दीत सक्त रात्रगस्त पेट्रोलिंग करीत असतांना पोकॉ/3363 पवन पाटील, पोकॉ/552 ज्ञानेश्वर पाटोळे यांना गोपनीय माहीती मिळाली की, दि. 16/07/2023 रोजी आषाढी आमावस्या असल्याने सकाळी प्रहरीचे सुमारास चाळीसगाव शहरातील नागद रोड लगत नायरा पेट्रोलपंप समोरील शेतातील पडीत घरात काही इसम गोलाकार स्थितीत खाली बसुन त्यामधे मानवी खोपडी व इतर पुजेच्या साहीत्यासह आघोरी पुजा करणेकरीता एकत्रित जमणार आहेत बाबत माहीती मिळाल्याने सदरची माहीती पोलीस निरीक्षक संदिप पाटील, सपोनि/ विशाल टकले, सपोनि/ सागर ढिकले यांना कळवुन बातमीची खात्री करणेकामी पो. स्टे. नेमणुकीचे अंमलदार पोना/1720 राहूल सोनवणे पोना/3136 महेंद्र पाटील पोशि/2545 रविंद्र बच्छे,पोशि/447 समाधान पाटील , पोशि/1419 विजय पाटील, पोशि/2400 राकेश महाजन, पोशि/208 आशुतोष सोनवणे,चालक पोहवा/2844 नितीन वाल्हे व चालक पोशि/336 गणेश नेटके, पोकॉ/ भरत गोराळकर असे पंचांसह मिळालेल्या माहीतीच्या दिशेने रवाना झाले. मिळालेल्या बातमीच्या अलिकडे शासकिय वाहन लावुन बातमीची खात्री करीता नायरा पेट्रोलपंप समोरील शेतातील पडीत घरात खात्री करता तेथे काही इसम खाली बसुन पुजा करतांना दिसून आले. पोलीसांची व पंचांची खात्री होताच छापा टाकुन खाली बसलेल्या इसमांना जागीच पकडुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे- 1) लक्ष्मण शामराव जाधव वय- 45 वर्ष रा. खडकी बायपास ता. चाळीसगांव जि. जळगाव, 2)शेख सलीम कुतुबुददीन शेख वय- 56 वर्ष रा. हजरत अली चौक नागद रोड चाळीसगांव जि.जळगाव 3)अरूण कृष्णा जाधव वय 42 वर्ष रा. आसरबारी ता.पेठ जि. नाशिक 4)विजय चिंतामन बागुल वय 32 वर्ष रा. जेल रोड नाशिक 5)राहुल गोपाल याज्ञीक वय 26 वर्ष रा. ननाशी ता. दिंडोरी जि. नाशिक 6)अंकुश तुळशीदास गवळी वय 21 वर्ष रा. जोरपाडा ता. दिंडोरी जि. नाशिक 7)संतोष नामदेव वाघचौरे वय 42 वर्ष रा.अशोकनगर नाशिक 8)कमलाकर नामदेव उशीरे वय 47 वर्ष रा. गणेशपुर पिंप्री ता.चाळीसगाव जि.जळगाव 9) संतोष अर्जुन बाविस्कर वय 38 वर्ष रा.अंतुर्ली (कासोदा) ता.एरंडोल जि.जळगाव असे सांगितले व सदर ठिकाणी वरील नमुद इसम हे गोलाकार स्थीतीत खाली बसुन त्यामध्ये मानवी खोपडी ,लिंबु, नारळ, रुद्राक्ष माळ, देवाची पितळी मुर्ती, पिवळया धातुचा नाग,पत्रावरील छापील देव, कंदमुळे,गोलाकार पितळी धातुचे बेरकंगण, केशरी शेदुर, आगरबत्ती पुडा, लोखंडी आडकीत्ता व कापुराची पुजा मांडुन गुप्त धना करीता आघोरी कृत्य करुन जादुटोणा करीत असतांना मिळुन आले. त्यांच्या ताब्यात अघोरी पुजा करीत असतांना एकुण 8,35,100 रु. किंमतीचा साहीत्य (आरोपीतांचे मोबाईल फोन, एक टोयोटा युनोव्हा कार क्रमांक MH16-AT-7557, व इतर अघोरी पुजा करण्याचे साहीत्य.) मिळुन आले आहे. सदर आरोपीतांविरुध्द पोकॉ/3363 पवन पाटील यांचे फिर्यादीवरुन गुरनं. 342/2023, महाराष्ट्र नरबळी आणी इतर अमानुष , अनिष्ठ व आघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटण करणे बाबत अधिनियम 2013 चे कलम 3(2) व 3(3) सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1)(3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि/सागर ढिकले व पोकॉ/435 प्रकाश पाटील हे करीत आहेत.
तरी सदर अघोरी पुजा करुन गुप्तधनाचा शोध करणारी टोळीचा शोध हा एम. राजकुमार पोलीस अधिक्षक जळगांव यांच्या आदेशाने व रमेश चोपडे, अपर पोलीस अधिक्षक चाळीसगांव तसेच अभयसिंग देशमुख, सहायक पोलीस अधिक्षक चाळीसगांव भाग चाळीसगांव, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, संदिप पाटील सपोनि/ विशाल टकले, सपोनि/ सागर ढिकले, पोना/1720 राहूल सोनवणे, पोना/3136 महेंद्र पाटील, पोना/2800 भुषण पाटील, पोशि/2545 रविंद्र बच्छे,पोशि/447 समाधान पाटील, पोशि/1419 विजय पाटील, पोशि/2400 राकेश महाजन, पोशि/208 आशुतोष सोनवणे, चालक पोहवा/2844 नितीन वाल्हे व चालक पोशि/336 गणेश नेटके, पोकॉ/भरत गोराळकर, पोकॉ/3363 पवन पाटील, पोकॉ/552 ज्ञानेश्वर पाटोळे यांनी केला आहे. तरी अशाच प्रकारे अघोरी विद्याच्या सहाय्याने गुप्तधन शोधणे, चमत्काराचा प्रयोग प्रसारीत करणे व आर्थिक फसवणुक करणे, नरबळी देणे, अमानुष कृत्य करण्याचा सल्ला देणे, पैशाचा पाउस पाडणे, अघोरी उपाय करुन रुग्णांवर उपचार करणे किंवा भाणामती करणे, अतिंद्रीय शक्ती असल्याचे भासवुन लोकांमध्ये दहशत करणे, मंत्रांच्या सहाय्याने भुत पिसाच्य दुर करण्याबाबत शक्ती असल्याचे भासवुन उपचार करणे, मानसिक विकलांग व्यक्तींमध्ये अमानवी शक्ती असल्याचे भासवुन त्यादवारे इतरांची फसवणुक करणे, अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या इसमांबाबत माहीती प्राप्त झाल्यास तात्काळ पोलीसांना माहीती कळवावी जेणेकरुन अशा गुन्ह्यातील आरोपीतांना कायमचा पायबंद घालणेकामी वेळीच मदत होईल याबाबत चाळीसगाव शहर पोलीसांकडुन आवाहन करण्यात येत आहे.