DPT NEWS NETWORK 🗞️✍️
*प्रिया पाटील यांची गावात मिरवणूक व सत्कार समारंभ*
जामनेर : जामनेर तालुक्यातील गारखेडे बु या छोट्याशा गावातील शेतकरी प्रकाश पाटील यांची मुलगी प्रिया प्रकाश पाटील हिने एमपीएससी परिक्षेत यश संपादन करून पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) बनली आहे.
या तिच्या यशामुळे गावकऱ्यांनी घोड्यावर बसवून शाही थाटात मिरवणूक काढली आहे.
मिरवणूक उपस्थित जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन यांनी प्रिया पाटील यांचा सत्कार केला व शुभेच्छा दिल्या.
प्रिया प्रकाश पाटील हिने लोकसेवा आयोग परीक्षा पास होऊन पोलीस उपनिरीक्षक बनलेली असून गावातील त्यांनी पहिली महिला पोलीस उपनिरीक्षक बनल्याचा मान मिळवला आहे. यामुळे गावातील ग्रामस्थांनी डीजेच्या तालावर वाजत गाजत घोड्यावर बसवून थाटाने भव्य अशी मिरवणूक काढून तिचा नागरी सत्कार केला आहे.
यावेळी जिल्हा परिषद जळगाव अधीक्षक अभियंता प्रशांत पाटील यांच्याहस्ते ग्रामस्थांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. प्रिया पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, भविष्यात मुलांनी प्रयत्न करावे, प्रयत्न केले तर यशस्वी व्हाल, माझी सुद्धा परिस्थिती नसताना मी वेळोवेळी अभ्यास केला व माझ्या आई-वडिलांनी मला प्रोत्साहन दिले.त्यामुळे मी लोकसेवा परीक्षा पास झाली आहे.
आज पोलीस उपनिरीक्षक प्रिया पाटील यांनी मी लोकांमध्ये राहून जनतेची सेवा करणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
याठिकाणी खान्देश तेली समाज मंडळाच्या वतीने तेली समाजाचे संत श्री संताजी जगनाडे महाराज यांची प्रतिमेला शाल, श्रीफळ, बुके देऊन अर्पण केले व उप पोलिस निरीक्षक यांचा सत्कार केला आहे.
उपस्थित असलेल्या खान्देश तेली समाज मंडळ महिला आघाडीच्या जळगाव जिल्हा सचिव प्रा. डॉ. सौ. योगिताताई चौधरी, जामनेर तालुका अध्यक्ष श्रीमती स्वातीताई चौधरी, उपाध्यक्ष श्रीमती सोनल जाधव, जामनेर तालुका अध्यक्ष अजय अशोक चौधरी, जामनेर तालुका सचिव निलेश हरी पाटील सर शहराध्यक्ष निलेश रमेश चौधरी, पंचायत समिती सदस्य रमणदादा चौधरी, संतोष पाटील सर, मुकेश जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कु.प्रिया हिला मार्गदर्शन करणारे तिचे आई वडील यांचा देखील मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला व त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.