DPT NEWS NETWORK 🗞️✍️
साक्री (अकिल शहा) : स्वर्गवासी पोपटराव राजाराम साळूंके यांच्या ४ थ्या पुण्यस्मरणानिमित्त शेवाळी (दा.) येथील शिवाजी माध्यमिक विद्यालयात आदिवासी विद्यार्थ्यांना कपडे व पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले.
आज शिवाजी माध्यमिक विद्यालयात शेवाळी येथे खान्देश एज्यूकेशन सोसायटी तामसवाडी संस्थेचे प्रसाकीय अधिकारी श्री.निंबा साळूंके याच्यां अध्यक्षेत इयत्ता दहावीच्या आदिवासी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकें व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक श्री.जितेंद्र साळूंके व पुष्पेंद्र साळूंके यांच्या उपस्थित प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री. राजेंद्र पगारे साहेब श्री.पवार साहेब सोबत माजी पंचायत समिती उपसभापती श्री नितीन साळूंके मार्केट कमिटीचे संचालक श्री.दिपक साळूंके माजी उपसंरपंच श्री माधवराव नांद्रे माजी सरपंच श्री.दगाजी साळूंके श्री.राजू माऊली साळूंके श्री.अशोक साळूंके श्री.सुभाष नेरकर श्री.पोपटराव साळूंके उपसरपंच श्री.केतन साळूंके श्री.पंडीत साळूंके यांच्या शुभ हस्ते वाटप करण्यात आले स्वर्गवाशी पोपटराव साळूंके याच्या जिवनचरित्रावर श्री. दिपक साळूंके, श्री. जितेंद्र साळूंके, श्री. निंबा साळूंके यानी मनोगत व्यक्त केले व शाळेचे माजी विधार्थी असल्याने आठवणीना उजाळा दिला, कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नाईक मॅडम व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.