DPT NEWS NETWORK ✍️
पुणे जिल्हा प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले
पुणे :- आपल्या बहिणीची छेड काढतो व आईला अश्लील भाषेत बोलतो या कारणावरून चांडोली तालुका खेड जिल्हा पुणे येथे एकाचा पाच आरोपींनी डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना घडली असून याबाबत खेड पोलिसांनी माहिती दिली की स्वप्नील अशोक इंगुले (वय-२२वर्षे राहणार मोशी तालुका हवेली) यांचा आठ दिवसापूर्वी चांडोली राजगुरुनगर येथील फळ उत्पादन रोपवाटिकेत खून झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास कोणताही पुरावा हाती नसतानाही अनोळखी व्यक्तीचा डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे पोलिसांना आढळून आले होते. त्या ठिकाणची बारकाईने तपासणी पाहणी केली परंतु खून झालेल्या खुनाचा उलगडा होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पुरावा त्याठिकाणी आढळून आला नाही.
त्यामुळे खून झालेला इसमाचा त्याचे नातेवाईक व आरोपींचा शोध घेणे खूप मोठे आव्हान पोलिसांपुढे होते. परंतु उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील साहेब, पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे साहेब, यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करून गोपनीय बातमीदारांच्या मार्फत पोलिसांनी माहिती गोळा करून काही धागेदोरे मिळतात का याचा शोध घेतला असता आरोपी शुभम अजय कांबळे (वय २४), सिराज अब्दुल सलाम दोघे राहणार मोशी व इतर तीन विधीसंघर्षित बालक यांनी बहिणीची छेड काढतो व आपल्या आईला अश्लील भाषेत बोलतो याचा राग मनात धरून स्वप्निल अशोक इंगुले याचा डोक्यात दगड घालून निर्गुण पणे खून केला असल्याची कबुली दिली. सदर खेड पोलीस स्टेशन येथे आरोपींच्या विरोधात भादविक ३०२,१४३, ४, १४८, १४९, याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडे कोणताही पुरावा हाती नसताना तसेच मयत इसमाचे नाव माहीत नसताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस हवालदार पुनाजी जाधव, शंकर भवारी, संतोष मोरे, विजय राहतेकर, प्रवीण गेंगजे, सुनील बांडे, संतोष कंठाळे, योगेश भंडारे, सागर शिंगाडे, यांनी हा गुन्हा २४ तासांच्या आत उघडकीस आणला.