DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी- अकिल शहा
साक्री :- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरती वसलेल्या शेवाळी (दा.) गावावरील जून्या महामार्गावरील पुलाची अवस्था अतिशय बिकट अवस्था झाली आहे. ग्रामस्थांनी ही बाब संबंधित विभागाच्या लक्षात आणून दिली होती. या पुलावरील संरक्षण (भिंत) कठडे तुटल्यामुळे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. कारण या पुलाखालून शाळकरी विद्यार्थी व ग्रामस्थ ये- जा करीत असतात अशा वेळी एखादी दुर्घटना घडली तर मोठी जीवित आणि होऊ शकते व तसेच पुलावरील खड्डे वाचविण्याच्या नादात या ठिकाणी छोटे-मोठे अपघात नेहमी होत असतात तरी संबंधित विभागाकडून वेळ काढू धोरण अवलंबिले जात असल्यामुळे गावकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. ४ जुलै २०२४ रोजी दर्शन पोलीस टाईम वृत्तपत्रात बातमी प्रसारित करण्यात आली होती बातमीची दखल घेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांकडून लवकरात लवकर काम पुर्ण करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
परंतु तिसऱ्या दिवशी फक्त प्लास्टिकच्या टाक्या ठेवून याच्या व्यतिरिक्त कुठल्याच कामाला सुरुवात न झाल्यामुळे व तसेच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण चे अधिकाऱ्यांची संपर्क करूनही त्यांच्याकडूनही फक्त लवकरच कामाला सुरुवात होणार आहे असे आश्वासन मिळत आहे. कामाला होत असलेल्या विलंबामुळे ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अशावेळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घ्यावी व लवकरात लवकर कामाला सुरूवात करून ते पुर्ण करुन द्यावे अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला प्रशासनाविरोधात रास्ता रोको आंदोलन करायला भाग पाडू नये असा गर्भित इशारा ही ग्रामस्थांनी यावेळी दिला आहे.