DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे :- डेंगू मृत्यू प्रकरणी धुळे महानगरपालिकेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. असे निवेदन राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले.
गेल्या महिन्यापासून धुळे शहरांमध्ये डेंगू रोगाणे थैमान माजविले आहे. घरोघरी डेंगूचे रुग्ण आहेत. शहरातील बहुतांशी दवाखाने डेंगू रुग्णांनी भरलेले आहेत. या सर्व गोष्टीला महानगरपालिकेचे प्रशासन, अधिकारी, पदाधिकारी जबाबदार आहेत.
शहरांमध्ये फवारणी केली जात नाही. गटारी, नाल्यांमध्ये औषधी टाकली गेली नाही. शहरात साफसफाई नाही. सर्वत्र घाण आहे.
शहरात डेंगू रोगामुळे जवळपास सहा रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. धुळे शहरातील सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध उद्योगपती, धर्मवीर गौरव जगताप यांचे डेंगूमुळे दुर्दैवी, दुःखद निधन झाले आहे. या सर्व मृत्यूला धुळे महानगरपालिका जबाबदार आहे.
तरी शहरातील डेंगू रुग्णांमुळे मृत्यू पावलेल्या गौरव जगताप व इतर सहा जणांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या धुळे महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी राष्ट्रवादी पक्ष्याच्या वतीने करण्यात आली.या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष्याचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत राजे भोसले,राष्ट्रीय खजिनदार जोसेफ मलबारी, भानुदासलोहार, यशवंतपाटील,
राजू डोमाळे, गोरख शर्मा, रईस काझी, राजेंद्र सोलंकी, नजीर शेख, दीपक देवरे, सोनू घारू, राजेंद्रचौधरी, राजेश तिवारी, मंगलदास लोहार, गोलू नागमल, समद शेख, बिलाल शेख, नजीर शेख, युसूफ शेख, चेतन पाटील शेख, रईस शेख पत्रकार, शकीला बक्ष, चेतना मोर, रश्मी घेठे, विश्वजीत देसले, रामेश्वरसाबरे, भोला सैदाने, वैभव पाटील, जयदीप बागल डॉमिनिक मलबारी आधी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.