आझादनगर पोलीसांची कागिरी, लाख रुपयांचा मुददेमाल हस्तगत
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे – शहरातील कॉटन मार्केट परीसरात चोरी करणारे परराज्यातील दोन आरोपींना मुद्देमालासह आझादनगर पोलीसांनी जेरबंद केले आहे. दाेघे आरोपी सऱ्हाईत गुन्हेगार असुन त्यांच्याविरुदध गुजरात राज्यात चोरी व खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
दिनांक – ०६/१२/२०२३ रोजी फिर्यादी अर्जुन भिका जोगी (वय-४१ वर्षे, व्यवसाय-हातमजुरी, रा. मु पो हिवरखेडा, जि. जळगाव)यांनी फिर्याद दिली को, दिनांक ०५/१२/२०२३ रोजी सकाळी अकराच्या सुमारास फिर्यादी हे म्हशी विक्री करीता होते. ते मार्केट परीसरात जात असताना एक काळ्या रंगाचे मोटार सायकल वरुन आलेल्या ईसमाने फिर्यादीस समोरुन धडक दिली. त्यामुळे ते जमिनीवर पडले. त्यामुळे तेथे गर्दी झाली गर्दीचा फायदा घेऊन मोटार सायकलस्वारचा साथीदाराने त्यांच्या खिशातील रोख रक्कम ५०,०००/- असे चोरी करुन नेवुन काळया रंगाचे मोटार सायकल वरुन पळुन गेले.
या प्रकरणी गुन्हा रजि नं ३४४/२०२३ भा दं वि कलम ३७९,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. नमुद गुन्ह्याचे तपासकामी मार्केट परीसरातील सीसीटीव्ही फुटेज व त्यातीलअज्ञात ईसम यांची शरीरयष्टी यांचेबाबत पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी खबरी नेटवर्क ॲक्टीव करून गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली की, नमुद गुन्हा हा शेख रामीक समद (रा.गुजराथ) याने त्याचा साथीदार याने केला आहे. सध्या ते गुजरात राज्यात पळुन गेलेला आहे, अशी खात्रीलायक माहीती मिळाल्याने पोनि देशमुख यांनी सदर आरोपीत यास ताब्यात घेणेकामी शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना गुजराथ राज्यातील नवी मोसाली येथुन आरोपीत नामे रामीक समद शेख (वय-२० वर्षे, रा-नवी मोसाली, सुरत, राज्य गुजराथ) यास ताब्यात घेतले त्याला पोलीसी हिसका दाखविल्यावर त्याने त्याचा साथीदार सईद खान नजीर खान पठाण उर्फ चुव्हा (मुळ रा. मानदखाना, ख्वाजा नगर, सुरत, हल्ली मुक्कामवाल्मीक नगर, हुडको, ता. शिरपुर, जि. धुळे) याचे नाव सागितले. त्यानंतर सईद खान नजीर खान पठाण उर्फ चुव्हा यास शिरपुर येथुन ताब्यात घेण्यात आले. नमुद दोन्ही आरोपीत यांचेकडुन गुन्ह्यात चोरीस गेलेल्या मुददेमालापैकी ३०,०००/- रु रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली ७०,००० किमतीची मोटार सायकल (एम एच १८ बी डब्ल्यु २६१४) असा एकुण १,००,०००/- रु रकमेचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला असून हवालदार सी. पी. पाटील हे अधिक तपास करीत आहेत.
धुळे पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधिक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सपोनि संदीप पाटील, हवालदार योगेश शिरसाठ, शांतीलाल सोनावणे, संदीप कढरे, गौतम सपकाळ, चंद्रकांत पाटील, पंकज जोंधळे, सचिन जगताप, सिदघार्थ मोरे, अजहर शेख, धिरज काटकर, संतोष घुगे यांनी ही कारवाई केली.