DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- हेमंत महाले
निजामपूर – तरुणांनी आपल्यातील न्यूनगंड बाजूला सारत स्वताला ओळखल पाहिजे स्वताची ओळख त्याच बरोबर सकारात्मक विचाराने कष्ट करण्याची जिद्द बाळगली तर कुठल्या हि नोकर भरतीत यश मिळवल्या शिवाय राहणार नहि असा आत्मविश्वास व्यक्त करीत धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांनी निजामपूर पोलीस ठाण्यात आयोजीत पोलीस भरती पुर्व प्रक्षिशण शिबीरातून शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगीतले.
जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांच्या संकल्पने तून निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नांने निजामपूर जैताणे सह माळमाथा परिसरातील माध्यमिक व उच्चमाध्यमिक तसेच आदिवासी आश्रम शाळेतील बारावी शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी व विध्यार्थ्यांनीसाठी संपन्न झालेल्या प्रशिक्षण शिबिरासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे,राखीव पोलीस निरीक्षक मुकेश माहुले,साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सुर्यवंशी, वरीष्ठ लिपीक रावळ,सायबर सेल चे पोलीस उपनिरीक्षक कोठुडे,निजामपूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक, हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटिल आदि मंचा वर उपस्थीत होते. जिल्हा पोलीस अधीक्षक धिवरे म्हणाले कि,नवीन तत्रंज्ञाना च्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना आत्मविश्वास व जिद्द ने सहभाग घ्यावाच लागेल तरच शहरी भागातील विदयार्थ्यांन प्रमाणे आपण कुठल्याही नोकर भरतीत यश मिळवू शकतो.यासाठी शालेय जिवनातच मित्र देखील चागले असले पाहिजेत वेसना पासुन दुर राहत ग्रामीण भागातील विध्यार्थी नी पोलीस भरतीसह कोणत्याही नोकर भरती च्या स्पर्धेत कष्ठा ने जिद्दी ने तयारी ठेवली पाहिजे. यावेळी प्रशिक्षण शिबीरातून पोलीस भरतीसाठी आवश्यक अर्जा सोबत लागणारी कागदपत्रे आदि ची माहिती वरीष्ठ लिपीक रावळ यांनी दिली पोलीस अधिक्षक कार्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक मुकेश माहुले यांनी मैदाना वरील धावणे गोठा फेक उंची, मोजने ,छाती मोजणे, या बाबत सविस्तर माहिती दिली.तसेच पोलीस उपनिरीक्षक कोठूडे यांनी पोलीस भरतीसाठी कशा पध्दतीने लेखी परिक्षा तयारी करावी या विषयी सखोल माहिती दिली.तसेच साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सुर्यवंशी यांनी मार्गदर्शन केले सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी प्रारंभी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकांत धिवरे यांचे स्वागत केले. यावेळी प्रशिक्षण शिबीरा साठी आलेले आदर्श विदया मंदिर निजामपूर जैताणे रामराव पाटिल आश्रम शाळा जैताणे, इंदवे येथील आश्रमशाळा,वालवे येथील आश्रमशाळा, दुसाणे येथील माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालय, छडवेलकोर्डे येथील विदयाथी विदयार्थ्यांनी ची विक्रमी उपस्थीत तसेच तरूणाचा सहभाग बघून जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी निजामपूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस अधिक्षक हनुमंत गायकवाड यांचे कौतूक केले.तसेच यावेळी सर्व प्रशिक्षण शिबीरा तील आलेल्या विदयार्थ्यांना निजामपूर पोलीसान तर्फे स्नेह भोजन देण्यात आले कार्यक्रमांचे सुत्रसंचलन प्रस्तावीक व आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांनी केले कार्यक्रमासाठी पोलीस अधिकारी,पोलीस कर्मचारी व पोलीसपाटिल यांनी विषेश परिश्रम घेतले.