नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांचा नववर्षाच्या पहिल्याच दिवशी खात्यातील कर्मचाऱ्यांना दणका, कामचुकार सात अंमलदार निलंबित

धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे

DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- संदीप अहिरे

धुळे : धुळे जिल्ह्यातील गुन्हेगारी व अवैध धंदे नियंत्रनात आणण्यासाठी पोलीस अधीक्षक धिवरे यांनी कठोर पाऊले उचलली असून नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सात कामचुकार अंमलदारांना निलंबित केले आहे. आणि खात्यातील लोकांना नवीन वर्षाच्या अश्या शुभेच्छा दिल्यात की आता खात्यात कुणीही कामचुकारपणा करणार नाहीत. निलंबित करण्यात आलेल्या अंमलदारांमध्ये साक्री येथील प्रदीप ठाकरे, राकेश बोरसे, मुक्ता वळवी, विनोद गांगुर्डे आणि किशोर पारधी अशा पाच जणांचा समावेश आहे. याशिवाय नियंत्रण कक्षातील महेंद्र ठाकूर आणि मोटारवाहन विभागाचे अमोल भामरे यांनाही सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. धिवरे यांनी जिल्हा अधीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर विद्यमान पोलीस अधिकारी, ठाणे अंमलदार आणि प्रशासकीय कामकाज पाहणार्‍या जवळपास सर्वांच्याच कार्यपध्दतीची त्यांच्या विशिष्ट पद्धतीने माहिती घेतली.

यानंतर जिल्ह्याच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करुन नाकाबंदी करण्याचे आदेश दिले. नाकाबंदी कालावधीतच दंगाविरोधी पथकातील काही अंमलदार अतिमहत्वाच्या बंदोबस्तात गैरहजर असल्याचे उघड झाले. काही अंमलदारांशी वरिष्ठ अधिकार्‍यांनी बिनतारी संदेशाव्दारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बेपर्वाई केली. वरिष्ठांची परवानगी न घेता ते कर्तव्यावर गैरहजर राहिल्याचे उघडकीस आले.

या पार्श्वभूमिवर अधीक्षक धिवरे यांनी अशा कामचुकार सात जणांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले. एवढेच नव्हे तर, त्यांच्याविरुध्द शिस्तभंगाची कारवाई करण्याचेही आदेश पत्रात म्हटले आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुका तसेच इतर महत्वाच्या बंदोबस्तावेळी कोणी कामात दिरंगाई किंवा कामचुकारपणा करु नये, हा कारवाईमागचा उद्देश असल्याचे सांगितले जाते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
6:20 pm, January 14, 2025
temperature icon 28°C
छितरे हुए बादल
Humidity 36 %
Wind 12 Km/h
Wind Gust: 18 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:09 pm
Translate »
error: Content is protected !!