DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- दत्तात्रय माने
पुणे :- महाराष्ट्रात दररोज सरकारी अधिकारी, क्लार्क, शिपाई कोणी ना कोणी लाच घेताना कुठल्यातरी जिल्ह्यात पकडले जातात तरीदेखील सरकारी यंत्रणेत नोकरी करणाऱ्यांमध्ये जणू काही लाचलुच प्रतिबंध विभागाचा धाकच उरला नाही अशा अविर्भावात राहून लाच घेत असतात.
असाच प्रकार पुणे येथे घडला यातील तक्रारदार यांनी दि 01/06/2023 रोजी ससून हॉस्पिटल, पुणे येथे त्यांचे रक्कम रु 1,43,000/- चे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी दाखल केले होते. सदर बिलाचे मंजुरीसाठी उपअधीक्षक कार्यालय ससून हॉस्पिटल येथे काम करणारे लोकसेवक जालिंदर कुंभार यांनी वैद्यकीय बिलाचे दोन टक्के रक्कम प्रमाणे 3000/- रु लाच मागणी केल्याची तक्रार दि 29/11/2023 रोजी तक्रारदार ह्यानी ला प्र वि पुणे येथे दिली होती.
पडताळणी दरम्यान वरील कारणासाठी लोकसेवक जालिंदर कुंभार यांनी पंचांसमक्ष 3000/- रु. ची लाच मागणी केली ती लाच तक्रारदार ह्यांचेकडे कडून दि 27/12/2023 रोजी लाच रक्कम रु 3000/- रु पंचांसमक्ष स्विकारल्यावर त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बंडगार्डन पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक माधुरी भोसले, पो.हवा. नवनाथ वाळके, पो. हवा. सरिता वेताळ, पो. शि. प्रवीण तावरे, चालक पो. कॉ. चंद्रकांत कदम सर्व नेमणूक ला.प्र.वि. पुणे यांनी केली.
वरील कारवाईसाठी अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, डॉ. शीतल जानवे अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शन लाभले.