DPT NEWS NETWORK 🗞️✍️
प्रतिनिधी. प्रा. नागेंद्र जाधव
चंदगड:- पाटणे फाटा येथील रहिवाशी मूळचे निटटूर ता चंदगड येथील भारतीय सैन्यदलातील जवान सुभेदार प्रकाश नरसू पाटील यांनी 19 मराठा लाईट इन्फट्री सैन्य दलातील 28 वर्षाची प्रदीर्घ देशसेवा करुन सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा निवृत्ती सत्कार सोहळा पाटणे फाटा येथे मंगळवारी दुपारी संपन्न झाला.
सकाळी माणगाव फाटा, पाटणे फाटा ते घर अशी सुभेदार प्रकाश, त्यांची पत्नी, आई, वडील यांची भव्य मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत करण्यात आले.कोल्हापूर तसेच चंदगड तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटना, पदाधिकारी, निटटूर, कलानिधीगड, पाटणे फाटा, मजरे कार्वे येथील ग्रामस्थ, माता, भगिनी, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच पाटणे फाटा व्यापारी मित्र मंडळ यांच्या वतीने पाटील दाम्पत्य व कुटुंबाचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, वृक्ष रोप देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर जिल्हा,चंदगड सैन्य दलातील वरिष्ठ अधिकारी, मान्यवर, आजी माजी सैनिकानी आपल्या मनोगतातून सुभेदार प्रकाश पाटील यांनी केलेल्या कार्याचा, त्यांच्या देश सेवेचा गौरव करुन भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या.