DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- योगेश गवळे
नाशिक :- निफाड येथून दिं ५ फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेलेली विवाहित महिला तिच्या दोन्ही मुलांचे मृतदेह शेत तळ्यात सापडले असून या प्रकरणी मयत महीलेच्या भावाने दिलेल्या माहितीवरून लासलगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार शिवापूर (शेळकेवाडी) ता. निफाड येथील ज्योती जालिंदर कोटकर आणि त्यांची दोन मुले हरीश जालिंदर कोटकर (वय ८) आणि कृष्णा जालिंदर कोटकर हे तिघेही दि ५ फेब्रुवारी रोजी घरातून निघून गेले होते. घरच्यांनी या तिघांचा सगळीकडे तपास केला परंतु काहीही तपास लागला नाही. गुरुवारी सायंकाळी पाच वाजता या तिघांचे मृतदेह शेळकेवाडी येथे त्यांच्याच मालकीच्या शेत तळ्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली.
घटना समजताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे, पो ऊ नि प्रवीण उद्ये तातडीने शेळकेवाडी येथे दाखल झाले व त्यांनी मृतदेहांचा पंचनामा केला. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ ललित कैलास कापसे रा. निफाड सोनेवाडी रोड यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान दुर्दैवी ज्योती कोटकर निफाड येथील कैलास लक्षण कापसे यांची कन्या असून ही घटना उघडकीस आल्यानंतर लासलगाव पोलीस कार्यालयात आणि निफाड ग्रामीण रुग्णालयात तिच्या नातेवाईकांनी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.