DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर:- तक्रारदार यांच्या शेजारी राहत असलेल्या शेजारी यांचा कुत्रा चावल्या कुत्रा चावल्यामुळे तक्रारदार व शेजाऱ्यांमध्ये वाद झाला त्यामुळे त्यांनी एकमेकांवर गुन्हे दाखल केले होते. एकमेकावर गुन्हा दाखल असून त्यामध्ये तक्रारदार आणि त्यांच्या मुलाला अटक न करण्यासाठी व गुन्ह्यामध्ये मदत करण्यासाठी आलोसे सहाय्यक फौजदार दिलीप तिवडे यांनी तक्रारदार यांच्याकडे 10,000/- ₹ लाच रक्कम मागणी केली होती. तडजोडीअंती 9,000/-₹ लाच स्वीकारली असता कोल्हापूर ला.प्र.वि. यांनी त्यांना रंगेहात पकडले असून आरोपी यांचेविरुद्ध हुपरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची कायदेशीर कारवाई काल सोमवार रोजी सुरू होती.
सदर कारवाई अमोल तांबे (पोलीस अधीक्षक), डॉ. शितल जानवे, (अपर पोलीस अधीक्षक), विजय चौधरी(अपर पोलीस अधीक्षक) लाप्रवि पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर ला.प्र.वि. पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांचे सापळा पथकातील पोलीस निरीक्षक बापू साळुंके, पो. उप. नि. बंबरगेकर, पोहेकॉ. घोसाळकर, पोना. सचिन पाटील, मपोकॉ. पुनम पाटील, चापोहेकॉ. विष्णु गुरव, चापोहेकॉ. सुरज अपराध ला.प्र.वि. कोल्हापूर यांनी कारवाई पार पाडली.