नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

40 हजारांची लाच घेतांना, आझाद नगर पोलीस स्टेशनचे सपोउनि सैय्यद, रंगेहात एसीबीच्या जाळ्यात

आझादनगर, धुळे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस उप निरीक्षक आरिफअली सैय्यद यांनी तकारदार यांचेकडुन ४०,०००/- रु लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आल्याने त्यांचे विरुध्द गुन्हा दाखल.


DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संदिप अहिरे

धुळे: तकारदार यांचे चुलतभाऊ यांचे दिनांक २२.०८.२०२१ रोजी अपघाती निधन झाले असुन त्यांनी त्यांच्या हयातीत HDFC ARGO या इन्शुरन्स कंपनीकडुन वैयक्तिक २ कोटी रुपयांची विमा पॉलीसी घेतली होती. त्यांचे मृत्यु नंतर विमा प्रतिनीधीने सदर पॉलीसीची रक्कम वारसांचे नांव जमा न करता परस्पर दुस-याचे नांवे जमा करुन फसवणुक केल्याने त्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल असुन सदर गन्हयाचा तपास सहायक पोलीस उप निरीक्षक आरिफअली सैय्यद यांच्याकडे आहे. सदर गुन्हयातील दुस-याच्या नांवे जमा झालेली गोठविण्यात आलेली विम्याची रक्कम वारसांच्या बँक खात्यात जमा होणकरीता तकारदार यांची वहिणी यांनी कोर्टात अर्ज केला होता. सदर अर्जावरुन कोर्टात सकारात्मक अहवाल देण्याकरीता तपासी अधिकारी सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफअली सैय्यद यांनी तकारदार यांचेकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदार यांनी दिनांक २७.०२.२०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे येथे दिली होती. सदर तक्रारीची दिनांक २७.०२.२०२४ रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफअली सैय्यद यांनी तक्रारदार यांचेकडे तडजोडीअंती ४०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम दिनांक २९.०२.२०२४ रोजी गिंदोडीया चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या मागील बाजुस असलेल्या भाग्यश्री पान कॉर्नर समोर स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असुन त्यांचे विरुध्द आझाद नगर पो.स्टे. जि. धुळे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफअली सैय्यद हे सोनगीर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असतांना त्यांना दि.२२.०७.२०१० रोजी ७०,०००/- रूपये लाच स्विकारतांना रंगेहात पकडल्याने त्यांचे विरूध्द धुळे शहर पो.स्टे. येथे गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हयात धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना २०१३ मध्ये ५ वर्ष शिक्षा दिल्याने त्यांना पोलीस खात्यातुन बडतर्फ करण्यात आले होते. त्यानंतर उच्च न्यायालयाने सन २०१९ मध्ये त्यांना दिलासा दिल्याने ते पोलीस खात्यात पुन्हा हजर झाले आहेत.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधिक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, तसेच पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, तसेच राजन कदम, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रविण पाटील, मकरंद पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर या पथकाने केली आहे. सदर कारवाईस नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस उप अधिक्षक नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
1:02 pm, January 13, 2025
temperature icon 25°C
साफ आकाश
Humidity 36 %
Wind 10 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!