DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- प्रा. नागेंद्र जाधव
चंदगड:- दि. 29/03/2024 रोजी रात्रौ वनपरीमंडळ चंदगड कडील के.एस. डेळेकर वनपाल चंदगड, आकाश मानवतकर वनरक्षक उमगाव, सागर कोळी वनरक्षक चंदगड, गुंडू देवळी वनसेवक उमगाव व वन्यजीव बचाव पथक मौ. नागवे ज.क.क्र. 26/b मध्ये रात्र गस्त घालत असताना जंगला लगतचे मालकी क्षेत्रात संशयास्पद बैटरीची हालचाल दिसून आली. तात्काळ स्टाफ समवेत बैटरीचे उजेडाचे दिशेने सदर मालकी क्षेत्राची तपासणी केली असता गोपाळ धोंडिबा गुरव, व. व 70, रा. नागवे, ता. चंदगड हे परवाना नसलेली सिंगल बोअर (बॅरल) काडतूस बंदूक व त्यामध्ये जिवंत काडतूस घालून खांद्याला लावून कपाळावर बैटरी लावून वन्यप्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने फिरत असताना मौ. नागवे मा.ग.नं. 255 या ठिकाणी मिळून आले. त्यांना मुद्देमाल सह ताब्यात घेऊन योग्य ती कागदपत्र तयार करुन वरील मुद्देमाल जप्त करुन ताबेत घेऊन सदर गट नंबर मधील आरोपीचे राहते घर परिसराची तपासणी केली असता घर परिसरालगत मृत वन्यप्राणी भेकर चा चामड्याचा अर्धवट केसाळ तुकडा मिळून आला. सदरचा चामड्याचा तुकडा जप्त करून ताब्यात घेऊन आरोपी गोपाळ धोंडिबा गुरव यांचे विरुद्ध वनपाल चंदगड यांनी आपलेकडील प्र.गु.री.नं 01/2024, दि. 30/03/2023 रोजीचा नोंद केला असून पुढील तपास श्री. नंदकुमार भोसले (वनक्षेत्रपालं चंदगड) हे करत असून.
सदरची कारवाई श्री. जी. गुरुप्रसाद (उपवनसंरक्षक कोल्हापूर), नवनाथ कांबळे (सहा. वनसंरक्षक कोल्हापूर ) यांचे मार्गदर्शनखाली नंदकुमार भोसले (वनक्षेत्रपालं चंदगड), के.एस. डेळेकर वनपाल चंदगड, श्रीमती वर्षदा पावसकर वनपाल मिरवेल, आकाश मानवतकर वनरक्षक उमगाव, सागर कोळी वनरक्षक चंदगड, श्रीमती सादीया तांबोळी वनरक्षक सुलीये, गुंडू देवळी वनसेवक व वन्यजीव बचाव पथक मधील सर्व सदस्य यांनी संयुक्त पार पाडली.
आरोपी गोपाळ धोंडिबा गुरव यास अटक करून मे. चंदगड न्यायालय येथे दि. 31/03/2024 रोजी हजर केले असता मे न्यायाल्याने आरोपीस एक दिवसाची वनकोठडी दिली आहे.