DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️प्रतिनिधी:- भुवनेश दुसाने
पाचोरा:- पाचोरा येथील पाचोरा पोलीस स्टेशनचे उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे, पोलीस निरीक्षक अशोक पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुंदरडे, पीएसआय योगेश गणगे, पीएसआय परशुराम दळवी, पीएसआय प्रकाश चव्हाण तसेच बीएसएफ चे कमांडो पथक यांनी श्री राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक प्रकाश टॉकीज चौक मच्छी बाजार आठवडे बाजार गांधी चौक जामनेर रोड रस्ता येथून गावात शांतता व कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी रूट मार्च काढून पोलीस अधिकारी यांनी सर्व पथकाला सूचना व मार्गदर्शन केले यावेळी सर्व पोलीस अधिकारी सर्व पोलीस कर्मचारी होमगार्ड बीएसएफ कमांडो उपस्थित होते.