DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनील मैदिले
भिवापूर :- अतिमद्य सेवन केल्याने घाटउमरी (पुनर्वसन) येथील एकाचा मृत्यू झाला. चंद्रभान नामदेव फुलझेले 43 असे मृतकाचे नाव असून येथील तहसील कार्यालयाच्या मागील परिसरात बुधवारी (दि.24)सायंकाळी त्याचे प्रेत आढळून आले.
मृतक चंद्रभान हा अविवाहित असून त्याला दारूचे व्यसन होते. बुधवारी सकाळी आठ वाजताच्या सुमारास तो घराबाहेर पडला. तेव्हापासून तो घरी परतला नाही. दरम्यान सायंकाळी तहसील कार्यालयामागे एक व्यक्ती मृतावस्थेत पडून असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. उपनिरीक्षक संदीप सडमेक यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान मृतकाची ओळख पटल्याने त्याच्या घरी सूचना देण्यात आली. घटनास्थळ पंचनाम्यानंतर प्रेत उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. भाऊ ओमप्रकाश फुलझेले याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पुढील तपास उपनिरीक्षक सडमेक करीत आहेत.