नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मुलगी पास झाल्याचा आनंद काही तास; खरकार कुटुबावर दुःखाचा डोंगर


DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी  –  रविंद्र गवळे

धुळे:- मृत्यू हा अटळ आहे कधी मृत्यू कोणाला येईल याचा भरोसा नाही. अशीच एक दुःखद घटना शिदखेडा तालुक्यातील भडणे येथील रहिवासी राजेंद्र पाटील गेल्या महिण्याभरापासून आजारी होते.खरकार परिवारात आनंद फक्त एका तासाचासाठी आला आणि निघून गेला मात्र दुखं हे आयुष्यभरासाठी देवून गेला.भडणे येथील माजी सरपंच एकनाथ राजाराम पाटील यांच्या पुतण्या राजेंद्र भास्कर पाटील याला एक मुलगा एक व एक मुलगी आहे.मुलगी मोठी असून नुकत्याच बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला होता मोठी मुलगी राजश्री राजेंद्र पाटील शिंदखेडा येथील एस .एस. व्ही. पी. एस. महाविद्यालयात कॉमर्सला होती. आज नुकताच बारावीचा निकाल लागल्याने तिला 65 % गुण मिळाले पास झाल्याचा आनंद मुलीने आपले वडील राजेंद्र पाटील यांना पेढे भरून साजरा केला मात्र या आनंदाला नियतीने साथ दिली नाही. अतिशय गरीब शेतकरी कुटुंब मोलमजुरी व काबाडकष्ट करून कुटुंब  आपला उदरनिर्वाह करीत होते. कुटुंबात आपली मुलगी पास झाल्याच्या आनंद आई व वडिलांनाही झाला संपूर्ण कुटुंब आनंदात असताना मात्र हा आनंद  फार काळ टिकला नाही नीयतीलाही मान्य नव्हते अवघ्या एका तासातच नियतीने राजश्री पाटील यांचे वडीलांना वयाच्या 36 व्या वर्षी प्राणज्योत मावळल्याने जगाचा निरोप घेतला. संपूर्ण कुटुंबात आनंद असताना नीयतीने खरकार परिवारात दुःखाच्या डोंगर कोसळल्याने भडणे गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली जात आहे.मयत राजेंद्र पाटील यांच्या पश्चात आई वडील मुलगा मुलगी असा परिवार आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:00 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!