नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

पाणी टंचाईसाठी राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ भेटले आयुक्तांना….


धुळे शहरात पाणीपुरवठा सुरळीत करा..राष्ट्रवादीची मागणी
भाजपाने धुळेकर जनतेला फसविले.. राष्ट्रवादीचा आरोप

धुळे:- धुळे शहरातील पाणीटंचाई व पाण्याच्या संदर्भात असलेल्या अडचणी बाबत आज राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या शिष्टमंडळाने रणजीत राजे भोसले व जोसेफ मलबारी यांच्या नेतृत्वामध्ये धुळे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त यांची भेट घेतली.
                   धुळे शहरांमध्ये या उन्हाळ्यामध्ये भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. काही भागांमध्ये आठ आठ दिवस पाणी येत नाही. ज्या भागांमध्ये पाणी येते ते गडूळ आणि खराब येते आहे. ठीक ठिकाणी जल वाहिन्या खराब झालेले आहेत. अक्कलपाडा धरणातील आलेलं पाणी पूर्ण क्षमतेने मिळत नाही. मोहाडी सारख्या भागांमध्ये महिन्यातून फक्त दोनदा पाणी मिळालेले आहे. शेकडो करोडो रुपयाचे निधी हा पाणीपुरवठ्यासाठी योजना आणण्याचा दावा भाजपचा फोल ठरलेला आहे. भाजपाने शब्द दिला होता की, एका दिवसाआड किंवा दररोज पाणी देऊ. पण आज धुळे शहरातील नागरिकांना सात ते आठ दिवसानंतर पाणी मिळत आहे. कॉलनी परिसरामध्ये तर पाणी मिळावे, म्हणून काही कर्मचारी रजा टाकून घरी राहत आहे. भाजपाने धुळे शहरातील नागरिकांची फसवणूक केली आहे. धुळे महानगरपालिकेतील प्रशासक, अधिकारी कर्मचाऱ्यांनी भाजपच्या दबावाखाली काम करू नये. धुळे शहरातील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा,वेळेवर व शुद्ध पाणीपुरवठा करावा. अशी मागणी यावेळेस धुळे शहर राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या शिष्टमंडळाने केली.
            यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रणजितराजे भोसले, जोसेब मलबारी, राजेंद्र सोलंकी, राजू डोमाळे, अशोक धुळकर, वाल्मीक मराठे, डी.टी पाटील, दीपक देवरे, जयश्री घाटे, भिका नेरकर, बरकत शाह, राजू चौधरी, राजेंद्र चौधरी, बंटी वाघ, आकाश वैसाने, गोलू नागमल, भूषण पाटील, दीपक देवरे,सलमान खान, सोनू गुजर, सोनू घारू, युसुफ शेख,निखिल मोमया, भटू पाटील, कल्पेश मगर, जीवन चव्हाण, रामेश्वर साबरे, बंटी बोरसे आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:19 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
47 %
18 Km/h
Wind Gust: 33 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!