DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा
साक्री : तामसवाडी ता. साक्री जि. धुळे येथील पोलीस पाटील महेंद्र वकील अहिरराव(वय २६) यांनी साक्री पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार, दि.२९ मे रोजी रात्री १२:३० च्या सुमारास ते त्यांच्या घरी रुमवर असतांना त्यांना तामसवाडी गावाचे माजी पोलीस पाटील उमेश वाघ यांनी मोबाइलवर फोन करुन कळविले की, तामसवाडी गावात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर साक्री कडुन धुळे कडे जाणा-या रोडावर एका अनोळखी इसमास एका अज्ञात वाहन चालकाने
ठोस दिल्याने तो रोडावर दुखापती अवस्थेत पडलेला आहे असे सांगितल्याने ते लागलीच त्या ठिकाणी गेले त्यावेळी रोडावर एक इसम दुखापती अवस्थेत पडलेला होता तेव्हा त्यांनी सदर इसमास पाहीले असता तो अनोळखी वाटल्याने त्यांनी सदर इसमा बाबत आजुबाजुस तपास करता त्याबाबत काहीएक माहीती मिळुन आली नाही तसेच त्याचे अंगावरील कपड्याचे पहाणी करता त्याच्या ओळखी बाबत काहीएक माहीती मिळाली नाही तेव्हा त्यांनी जमलेल्या लोकांच्या व पोलीसांच्या मदतीने सदर दुखापती इसमास खाजगी वाहनात टाकुन साक्री येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार कामी दाखल केले असता डॉक्टर साहु मॅडम यांनी सदर अनोळखी इसमास तपासून रात्री ०१:३० वाजेच्या सुमारास मयत घोषीत केले.
भरधाव वेगाने रोडाच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून अनोळखी इसमास ठोस देणाऱ्या व त्याच्या मुर्त्यूस कारणीभूत ठरणाऱ्या अज्ञात वाहन चालकांविरुद्द साक्री पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास साक्री पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरिक्षक संदिप मुरकुटे करीत आहेत.