DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- भुवनेश दुसाने
जळगाव:- जामनेर तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिच्या खून प्रकरणात अटक केलेल्या संशयित आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती शरद पवार यांनी २५ जून पर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. याबाबत अधिक असे की, जामनेर तालुक्यातील एका गावातील सहा वर्षीय मुलीला आईसक्रीम कोन घेऊन देण्याचे अमिष आमिष दाखवून सुभाष उमाजी भिल (सोनवणे) (वय- ३५, रा. वावडदा, ता. जळगाव, ह. मु. केकतनिंभोरा, ता.जामनेर) याने केळीच्या बागेत नेऊन खून केल्याची घटना ११ जून रोजी रात्री ११ वाजता उघडकीला आली होती. त्यानंतर शवविच्छेदनात या बालिकेवर अत्याचार झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याने याप्रकरणी पोस्कोचे कलम वाढवण्यात आले होते. घटना घडल्या पासून सुभाष भिल हा फरार होता. त्याला गुरुवार, २० जून रोजी रात्री १० वाजता त्याला भुसावळ शहरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर शुक्रवार २१ जून रोजी दुपारी ३ वाजता संशयित आरोपीला जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्या. शरद पवार यांनी पाच दिवसांची २५ जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील ॲड. सुरेंद्र काबरा यांनी युक्तीवाद केला आहे.