नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

अवघ्या एका रुपयात पीक विमा!
शेतकऱ्यांनी फायदा घ्यावा – मा. आमदार राजू पारवे

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले

उमरेड:-  प्रधान मंत्री पीक विमा योजने अंतर्गत शेतकऱ्यांना फक्त एका रुपयात पीक विमा उतरवता येत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शेतकरी हितदक्ष माजी आमदार राजू भाऊ पारवे यांनी केले आहे.
कोरडा किंवा ओला दुष्काळ, कीड, रोगराई तसेच इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीपासून शेतकऱ्यांच्या पिकांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रधान मंत्री पीक विमा योजना राबवते. या योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयांत पीक विमा उतरवून देण्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी केलेली असून त्यानुसार विम्याचे अर्ज भरायला सुरू झाले आहे. भात (धान, कापूस, सोयाबीन, तुर, मुग, उडीद, भुईमूग, मका, तीळ, कारळ,  खरीप ज्वारी, नाचणी, बाजरी आदी पिकांचा यात समावेश असून येत्या १५ जुलै पर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी जवळच्या सि. एस. सी. केंद्रावर जाऊन आपल्या पिकांचा विमा उतरवून घ्यावा असे आवाहन शेतकरी हितदक्ष माजी आमदार राजूभाऊ पारवे यांनी केले आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:59 pm, February 26, 2026
26°C
साफ आकाश
46 %
22 Km/h
Wind Gust: 37 Km/h
Clouds: 0%
Visibility: 10 km
Sunrise: 6:54 am
Sunset: 6:34 pm
Translate »
error: Content is protected !!