DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
उमरेड:- सिबिल स्कोअर खराब असल्याचे कारण देत बँकेने पीक कर्ज द्यायला नकार दिल्यास शेतकरी बांधवांनी तात्काळ संपर्क करावा असे आवाहन मा. आमदार राजूभाऊ पारवे यांनी केले आहे.
पेरणीच्या काळात बहुसंख्य शेतकऱ्यांना बी-बियाणे व इतर गोष्टींसाठी बँकेतून पीक कर्ज घ्यावे लागते. शेतकऱ्यांना जलदगतीने पीक कर्ज मिळावे यासाठी सरकार कटिबद्ध असून बँकांना तसे सक्त आदेश आहेत. तरीही बँका शेतकऱ्यांना त्यांचे सिबिल स्कोअर खराब असल्यास पीक कर्ज द्यायला नकार देतात. परंतु कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले पाहिजे अशी महायुती सरकारची भूमिका असून सिबिल स्कोअर खराब असल्याच्या कारणाने जर बँकेने शेतकऱ्याला कर्ज नाकारले तर संबंधितांवर गुन्हा दाखल केला जाईल असे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. उमरेड विधानसभा मतदार संघात कुठेही शेतकऱ्यांची बँकेकडून अडवणूक झाल्यास ०५, कृष्णकुंज, टिपले-ले आऊट भिवापूर रोड, उमरेड येथील जनसंपर्क कार्यालयात तात्काळ संपर्क करावा असे आवाहन कर्तव्यदक्ष मा. आमदार राजू पारवे यांनी केले आहे.