DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- नारायण कांबळे
कोल्हापूर – दिनांक 3 जून 2024 रोजी रात्री डॉ. सरोजीनी नायडु विद्यालयाच्या मागे उघड्यावर सुशांत दिपक कांबळे (वय 18 रा.आसरा नगर इचलकरंजी ता. हातकणंगले जिल्हा- कोल्हापूर) या तरुगाचा धारदार शस्त्राने तोंडावर, पाठीवर, मांडीवर वार करुन, त्याचा खुन करण्यात आला. याबाबत त्याची आई दिपाली दिपक कांबळे यांनी शहापूर पोलीस ठाण्यात तक्रारी दिली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखुन पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी आरोपी तात्काळ ताब्यात घेण्याबाबत शहापूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुर्यवंशी व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे, पोलीस निरीक्षक, रविंद्र कळमकर यांना सुचना दिल्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी सदरच्या गुन्हयाबाबत माहिती घेवुन गुन्हयातील आरोपीना ताब्यात घेणे करीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखे कडील पोलीस उप निरीक्षक संदिप जाधव व शोष मोरे यांचे अधिपत्याखाली व शहापूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी यांनी पोलीस उप निरीक्षक श्रीकृष्ण दरेकर यांचे पथक, अशी दोन तपास पथक तयार करुन, त्यांना सुचना देवुन रवाना केले. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण तपास पथक गुन्हयातील संशयीत आरोपी अतिष नेटके, आर्यन चव्हाण, प्रदिप पारस सर्व रा. इचलकरंजी शोध घेत असताना, सदरचे आरोपी हे कोल्हापूर येथे राजाराम कॉलेजजच्या इमारतीच्या मागील बाजुस असलेल्या मैदानामध्ये आले असल्याचे समजुन आले. त्याबाबत खात्री करुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने व शहापूर पोलीस ठाणेच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा लावुन त्यांना जागेवरच ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीना नाव पत्ता विचारले असता त्यानी त्यांची नावे अतिष उर्फ टक्या दत्तात्रय नेटके (वय 19 रा. 102 सहकारनगर इचलकरंजी), आर्यन सरदाग चव्हाण
(वय 21 रा.गणेश नगर इचलकरंजी), बाळु उर्फ प्रदिप पारस यादव (वय 20 रा.जे.के. नगर शाहापूर) यांच्याकडे चौकशी करता यांनी केलेल्या गुन्हयाची कबुली दिली. नमुद आरोपीकडे अधिक चौकशी केली असता आरोपी अतिष दत्तात्रय नेटके हा व
मयत सुशांत दिपक कांबळे हे दोघ एकमेकाचे मित्र होते. त्यांचेत घोडागाडी परत मागितली या कारणावरून व घोडागाडी शर्यतीच्या जुन्या कारणावरुन गेल्या काही दिवसापुर्वी वाद झाले होते. पुर्वी झालल्या भांडणाचा मनात राग धरुन बुधवारी (ता. 3) सुशांंत दिपक कांबळे हा डॉ. सगेजनी नायडु विद्यालयाजवळ थांबलेला असताना आरोपी अतिष उर्फ टक्या नेटके, आर्यन चव्हाण, प्रदिप पारस असे एका गाडीवरून तेथे आले व मयत सुशांत दिपक कांबळे याs धारदार शास्त्राने त्याचे तोंडावर, पाठीवर वार करुन, त्याचा खुन केला. अशी त्यांनी माहिती दिली. आरोपी हे सदरचा प्रकार घडल्या नतर काही तासातच त्याना स्थानिक गुन्हे अन्तेषण शाखेच्या पथकाने व शहापूर पोलीस ठाणे पथकाने सुयुक्ततीकरित्या ताब्यात घेतले.
![](https://dpolicetime.com/wp-content/uploads/2024/07/img_20240704_2229192972018638325276579.jpg)
सदरची कामगीरी कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडें पाटील, उप तिभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळे यांचे मार्गदर्शना प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रतिंद्र कळमकर, शहापूर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक साचिन सुर्यवंशी, पोलीस उप निरीक्षक श्रीकृष्ण दरेकर, स्था. गु. शाखेकडीळ पोलीस उप निरीक्षक संदिप
जाधव, शेष मोरे, सहा. फौजदार खंडेराव कोळी, पो.हे.कॉ. प्रकाश पाटील, प्रशांत कांबळे, पो.ना.सागर चौगले, संजय कुंभार, महेश खोत, चालक राजेंद्र वरांडेकर तसेच शहापूर पोलीस ठाणे कडील साजिद कुरणे प्रमाद भांगरे, मोहिते, अर्जून फातले यांनी केलेली आहे.