विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व जागा भाजपाच जिंकणार – बबनराव चौधरी
DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे :- भारतीय जनता पार्टी धुळे ग्रामिण जिल्हा कार्यकारिणीची बैठक जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली दि.४ जुलै रोजी पारोळा रोडवरील राम पॅलेस धुळे येथे संपन्न झाली. बैठकीत प्रथम नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी म्हणाले की, आगामी काळात होणाऱ्या विधानसभा, जिप, पं. स. निवडणुका जिंकण्यासाठीच्या दृष्टीने सर्वांनी कामाला लागावे, बूथ सक्षमीकरणावर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी भर द्यावा. मेरा बूथ सबसे मजबूत या नुसार सर्वांनी मतदारांशी प्रत्यक्ष संपर्क साधत त्यांना सर्व योजनांचा लाभ मिळवून देण्याकरिता प्रयत्न करावे. आपण जगातील नंबर एकच्या राजकीय पार्टीचे सदस्य असून आपली ही पार्टी नुसती राजकीय पार्टी नसून एक परिवार आहे. विधानसभा निवडणुकीत धुळे जिल्ह्यातील सर्व जागा भाजपाच जिंकणार असा निर्धार हि जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी व्यक्त केला.
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी तर राज्य सरकरचा अर्थसंकल्पचा जिल्हा सरचिटणीस डि. एस. गिरासे, मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनाचा जिल्हा सरचिटणीस सौ. लिलाबाई सुर्यवंशी यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला व एकमताने अभिनंदन ठराव पारित करण्यात आला. तसेच लोकसभेत हिंदु समाजाविषयी खा. राहुल गांधी वाईट बोल्याबद्दल जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले यांनी निषेधाचा ठराव मांडला व निषेध करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिप अध्यक्षा. सौ. धरतीताई देवरे, माजी जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, धुळे जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी, डि. एस. गिरासे, अरुण धोबी, शैलेंद्र आजगे, सौ. लिलाबाई सुर्यवंशी, संस्था चालक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष वसंतराव बच्छाव, किसान मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष बापु खलाणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अरविंद्र जाधव, प्रदीप कोठावदे, भाऊसाहेब देसले, चंद्रजित पाटील आदी उपस्थित होते. यावेळी नारायण पाटील, बापु खलाणे, प्रा. अरविंद्र जाधव, मोहन सुर्यवंशी, देवेंद्र पाटील, प्रमोद गांगुर्डे यांनी आपले विचार व्यक्त केले. या बैठकीसाठी धुळे तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, शिरपुर तालुकाध्यक्ष किशोर माळी, शिंदखेडा तालुकाध्यक्ष दिपक बागल, साक्री तालुकाध्यक्ष संजय अहिरराव, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष विक्की कोकणी शहराध्यक्ष डाॅ. राजेंद्र पगारे, जिल्हा उपाध्यक्ष नारायण चौधरी, अॅड. गजेंद्र भोसले, अशोक सुडके, जिल्हा चिटणीस प्रा. रमेश खैरनार, पंकज कदम, सौ. सुवर्णा आजगे, दिनेश नवरे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जितेंद्र जैन, सहप्रमुख मोतीलाल पोतदार, मा. व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष एन. डी. पाटील, भटक्ये विमुक्त आघाडी प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र भोई, अल्पसंख्यक मोर्चा जिल्हाध्यक्ष मुबीन शेख, जिप सदस्य आसुतोष पाटील, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले, अनु. जाती मोर्चा जिल्हाध्यक्ष विक्रम तायडे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष विद्याधर पाटील, अध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष विलास मोरे, उद्योग अघाडी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष आर. के. माळी, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष शांताराम पाटील, नथ्थु वारुडे, योगीराज शिंपी, अॅड. सुरेश शेवाळे, प्रतिक कोतकर, एस. एन. निकम, पंकज हिरे, दिग्विजय गाळणकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस किशोर सिंगवी यांनी केले तर आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी यांनी केले. बैठकीस पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष, पदाधिकारी, आघाड्यांचे संयोजक, पदाधिकारी, युवा मोर्चा, महिला मोर्चा, सर्व प्रकोष्ट, आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपा जिल्हा प्रसिध्दी व मीडिया प्रमुख जितेंद्र जैन बंब यांनी प्रसिध्दीस दिले आहे.