DPT NEWS NETWORK 🗞️✍️
धुळे :- ४८ महाराष्ट्र बटालियन एन.सी.सी.धुळे येथे विद्यार्थ्यांना सायबर तज्ञ अॅड. चैतन्य भंडारी यांनी सायबर विश्वात होणारे गुन्हयांबाबत सावधान केले व त्यांनी विद्यार्थ्यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सने होणारे गुन्हयांबाबत देखील कशी सावधानगिरी बाळगावी यासंदर्भात विविध सूचना दिल्या व उपस्थित विद्यार्थ्यांनींना चॅींग रुम फ्रॉड व हिडन कॅमेरा कशा प्रकारे ओळखावे याबाबत सूचना देखील दिल्या. यावेळेस विद्यार्थ्यांनी देखील मोठया उत्साहाने अॅड. चैतन्य भंडारी यांना सायबर क्षेत्रातील विविध प्रश्न व समस्या विचारले व अॅड. भंडारी यांना त्यांना समाधानकारक उत्तर दिले. विद्यार्थ्यांनी आपले सोशल मिडीयाचे पासवर्ड कशा प्रकारे ठेवावे,जेणेकरुन त्यांचे सोशल मिडीया अकाउंटस सुरक्षित राहतील याबाबत देखील त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व मुलींना फोटो मार्कंग पासून त्यांनी कसे सुरक्षित राहावे व कशा प्रकारे सुरक्षा बाळगावी याबाबत सूचना दिल्या. सदरील उपक्रम पोलिस अधिक्षक श्री. श्रीकांत धिवरे साो. यांच्या आदेशानुसार राबविण्यात आला. याप्रसंगी ४८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडंट शैलेंद्रजी गुप्ता, सुदिप मिश्रा, करमजीतसिंग व इतर मान्यवर तसेच विद्यार्थी गप मोठया संख्येने उपस्थित होते.