समाज भवनचे केले लोकार्पण
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- येथील आठवडी बाजाराच्या जागेचे बांधकाम व व्यापारी संकुलाचे भूमिपूजन माजी आमदार राजू पारवे यांनी शुक्रवारी (दि. ५) केले. शहरात उभारण्यात आलेल्या समाज भवनचे लोकार्पणही पारवे यांच्या हस्ते झाले.
येथील आठवडी बाजारासाठी स्वच्छ व प्रशस्त जागा उपलब्ध व्हावी तसेच व्यापाऱ्यांसाठीही चांगले व्यापारी संकुल असावे यासाठी राजू पारवे प्रयत्नशील होते. केंद्राच्या विशेष भांडवली गुंतवणुकीतून राज्याला विशेष सहाय्य योजने अंतर्गत व्यापारी संकुलाच्या बांधकामासाठी २ कोटी ३२ लक्ष रू. इतका तर बाजार जागेच्या बांधकामासाठी ९९.९५ लक्ष रू. निधी राजू पारवे यांनी मंजूर करून आणला. या दोन्ही कामांचे भूमिपूजन त्यांनी केले.
तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या समाज भवनाचे आज लोकार्पणही राजू पारवे यांनी केले. या वेळी आनंद गुप्ता, महेश दडमल, गोविंद गुप्ता, मनोहर बोरकर, रमेश भजभूजे, गजानन दुधपचारे, जावेद कुरेशी, सचिन धनविजय, रमेश नक्षीने, रीना बांडेबूचे, ज्योती रामटेके, जयंत उमरेडकर, मनीषा बावणे, शालू मेश्राम, रंजू श्रीरामे, देवा थेरे, रजनीकांत खांदे, योगेश भोगे, दिनेश रामटेके, वैशाली विश्ववेकर, सरोज गायकवाड या मान्यवरांसह इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.