DPT NEWS NETWORK 🗞️✍️प्रतिनिधी:- निवास गागडे
इचलकरंजी पोलीसांना गोपनीयद्वारे गुटखा असल्याची माहिती मिळताच पोलिस कॉन्सटेबल आदित्य मारुती दुंडगे यांनी मिळालेल्या माहितीनुसार घटनास्थळी जाऊन गुरुराज मल्लाप्पा रेवडी रा. जवाहर नगर सॉमी कारखाना जवळ यास अटक करून त्यांच्याजवळचा 12 लाख रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार मासोबा गल्ली नं १ विक्रम नगर इचलकरंजी येथील जुबेदा अश्रफअली कितुरे यांचे मालकीचे अश्रफअली मंजिल नावाने इमारतीमध्ये भाड्याने घेतलेल्या खोलीत आरोपी गुरुराज मल्लाप्पा रेवडी हा त्याच्या स्वतःच्या फायदा करिता महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करणेस बंदी असताना देखील त्याच्याजवळ गुटखा मिळुन आला यामध्ये ए. एम्. डी. पान मसाला किंमत १,०८,००० रुपये ,एम्. सेंटेड तंबाखू किंमत २,००० रूपये ,स्टार पान मसाला किमंत ४५,६९८ रुपये ,बी – १ सुगंधी तंबाखू किमंत ११,२०० रुपये ,मुसाफिर पान मसाला किंमत ७३,४४० रुपये ,एम् – ४ रॉयल जा.जर्दा किंमत १९,८९० रुपये ,केसऱ्युक्त विमल हिरव्या रंगाचा पान मसाला किंमत १,३०,६८० रुपये ,वि – १ टोबॅको हिरव्या रंगाचा किंमत २०,६८० रुपये , केसऱ्युक्त विमल निळ्या रंगाचा पान मसाला किंमत २,२४,४०० रुपये , वि – १ टोबॅको निळ्या रंगाचा किंमत ३३,०००..रुपये ,केसरयुक्त विमल लाल रंगाचा पान मसाला किंमत २४०,००० रुपये ,वि -१ टोबॅको लाल रंगाचा किंमत २,०७,००० रुपये , कांतारा पान मसाला अशा प्रकारच्या पान मसाला व सुगंधी तंबाखू गुटखा असा एकूण १२,०३,९८६ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला . आरोपीवर इचलकरंजी पोलीस ठाणे येथे बेकायदेशररित्या गुटखा विक्री विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३,२७४,२७५, १२३तसेच अन्न सुरक्षा मानदे कायदा कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.