भिवापूर पोलिसांची कारवाई
वाळू तस्करांत खळबळ
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले
भिवापूर :- चोरीची वाळू भरलेले पाच ट्रक आज पहाटे भिवापूर पोलिसांनी सापळा रचून जप्त केले. या कारवाईने खळबळ उडाली असून वाळू तस्करांचे धाबे दनाणले आहेत.
मागील काही दिवसांत पवनी ते नागपूर वाळूची चोरटी वाहतूक बरीच वाढली आहे. विशेष करून रात्रीच्या सुमारास ओव्हरलोड वाळू भरलेले ट्रक धावताना दिसतात. त्यावर आळा घालण्यासाठी भिवापूर पोलिस प्रयत्नशील होते. यातच आज पहाटे वाळू भरलेले ट्रक नागपूरच्या दिशेने जात असल्याची विश्वसनीय माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली. त्या आधारे भिवापूर उमरेड मार्गावरील थुटानबोरी पुनर्वसन येथे नाकाबंदी करण्यात आली. पहाटेच्या सुमारास काही ट्रक भिवापूर वरून उमरेडच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. त्यांना थांबवून चौकशी केली असता सर्व पाचही ट्रकमध्ये ओव्हरलोड वाळू भरलेली मिळून आली. चालकांकडे रॉयल्टी बाबत विचारणा केली असता रॉयल्टी नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून ते चोरीची वाळू वाहून नेत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी एमएच 49 एटी 7222, एमएच 49 एटी 8012, एमएच 33 टी 2333, एमएच 40 सीटी 7222 व एमएच 49 एटी 5028 क्रमांकाचे पाच ट्रक ताब्यात घेत ठाण्यात जमा केले. या कारवाईत पाच ट्रक एकूण किंमत 80 लक्ष व त्यातील 31 ब्रास वाळू एकून किंमत एक लक्ष 55 हजार असा एकूण 81 लक्ष 55 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पो. हवा. राकेश त्रिपाठी, प्रीतम खोपे यांच्या तक्रारीवरून ट्रक चालक मोहम्मद मीनाज खान 32, मोहम्मद इसराईल अकबर खान 36, सचिन अण्णाजी मांडवकर 40, मोईन जलील खान 25 सर्व राहणार नागपूर (खरबी) यांच्यासह ट्रक मालकांविरुद्ध 303(2), 49,3(5), 281, 125 सहकलम 48(7),48(8) जमीन महसूल यासह खाणी खनिजे व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान याविषयींच्या विविध कलमांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले. ही कारवाई ठाणेदार जयकिशोर निर्मल, पोलीस कर्मचारी राकेश त्रिपाठी, किशोर ठाकूर व प्रीतम खोपे यांनी पार पाडली.
—> पळ काढण्याचा प्रयत्नात ट्रक उलटला
पोलिसांनी थांबण्याचा इशारा करताच ट्रक क्र. एमएच 49 एटी 5028 च्या चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने भरधाव ट्रक थुटानबोरी गावाच्या दिशेने वळवीला मात्र ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने काही अंतरावर असलेल्या वळणावर ट्रक उलटला व त्यातील काही वाळू रस्त्यावर पसरली. सुदैवाने यात प्राणहानी झाली नाही.