पोलिसांचे काही समजेना
DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी
भिवापूर :- गत आठवड्यात एकाच वेळी पाच ट्रक जप्त करुन भिवापूर पोलिसांनी वाळू वाहतुकीवर ब्रेक लावले होते. मात्र हे ब्रेक सैल झाले असून वाळूच्या चोरट्या वाहतुकीने पुन्हा एकदा जोर धरला आहे. भिवापूरसह भिसीमार्गे रात्री व पहाटेच्या सुमारास वाळू भरलेले ट्रक पूर्ववत धावतांना दिसु लागले आहेत.
जुलै मध्ये पावसाचा जोर वाढताच या मार्गावरील वाळू वाहतूक मंदावली होती. मात्र पावसाने उसंत घेताच वाळू भरलेले ट्रक पुन्हा धावायला लागलेत. ठाणेदार जायकिशोर निर्मल यांनी सापळा रचून गत 2 ऑगस्टला एकाच वेळी नागपूर (खरबी) येथील पाच टिप्परवर जप्तीची कारवाई केली. त्याने तस्करांचे धाबे दनाणलेत व अवैध वाळू वाहतुकीला ब्रेक लागले. परंतु लागलेले ब्रेक अल्पावाधित सैल झालेत. कारवाई करून पाच दिवस लोटायच्या आतच अवैध वाळू वाहतुकीला आणखी वेग आला आहे. रात्री आणी पहाटेच्या सुमारास ओव्हरलोड वाळू भरलेले ट्रक महामार्गावरून बिनधास्त धावतांना दिसू लागले आहेत.
—-> गुडेगाव, मोहरणा येथे होते वाळू चोरी
पावसामुळे वैनगंगा नदी पात्रातील पुष्कळसे वाळु घाट बंद आहेत. पवनी तालुक्यातील गुडेगाव आणी लाखांदूर तालुक्यातील मोहरणा केवळ या ठिकाणाहून चोरीची वाळू येणे सुरु आहे. नागभीड तालुक्यातील एका घाटातूनही चोरून वाळू काढली जात असल्याचे समजते.
—-> दररोज धावतात पन्नास ते साठ ट्रक
पूर्वी दीडशे ते दोनशे ट्रक भिवापूरसह कान्पा – भिसी मार्गे नागपूर, हिंघणघाट व वर्धा, अमरावती येथे ये जा करायचे. सध्या ट्रकचा हा आकडा पन्नास ते साठवर आलेला आहे.
—–> भिवापूर – भिसी पोलिसांचे काही समजेना !!!
वाळू वाहतुकीला आळा घालण्यासाठी भिवापूरचे ठाणेदार निर्मल यांनी पहिल्यांदाच डीबी पथकाची स्थापना केली. मात्र वाळू वाहतुकीवर रोक लावण्याईवजी पथकातिल कर्मचारी भलत्याच कामात गुंतले असल्याचे समजते. भिसीचे ठाणेदार मुलांनी यांची तीन दिवसांपूर्वी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी जितेंद्र चांदे यांच्या नियुक्तीचे आदेश निघाले आहेत. ते अद्याप भिसी येथे रुजू व्हायचे आहेत. रुजू झाल्यानंतर वाळूच्या अवैध वाहतुकीबाबत ते काय भूमिका घेतात याकडे परिसरातील नागरिकांच्या नजरा लागून आहेत. मुलांनी यांच्या कार्यकाळात भिसी मार्गावर अवैध वाळू वाहतुकीला प्रचंड उधाण आले, हे येथे उल्लेखनीय.