DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी – प्रा. भरत चव्हाण
नवापूर :- नवापूर तालुक्यातील खळबळजनक घटना विसरवाडीत आठवडे बाजारात भर दिवसा खून विसरवाडीत गुरुवारी आठवडे बाजार असल्याने ढोरपाडा येथील दांपत्ये कामानिमित्त आले.
पती अशोक ताऱ्या गावित आणि पत्नी बबिता अशोक गावित कलावती कॉम्प्लेक्स येथे आपल्या कौटुंबिक वादावरून एकमेकांशी भांडू लागले. परंतु ते भांडण जीव घेणार याची कल्पना देखील बबिताला नव्हती.
पती अशोकचा भांडणात राग अनावर झाला. रागाच्या भरात हैवान झाला. बबिताला काही कळण्याच्या आत त्याने चाकू काढला नि तिच्या छातीवर सपासप वार केले. रक्तबंबाळ होऊन बबिता जमिनीवर कोसळली. आठवडे बाजार असल्याने नागरिकांची गर्दी जमली.
परंतु पती पत्नीत कोणी समजोता करु शकले नाही.घडलेल्या घटनेची खबर विसरवाडी पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील, लिनेश पाडवी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मारेकरी पतीला ताब्यात घेतले. जखमी पत्नीला त्वरित उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
चाकूचे घाव छातीत खोलवर गेल्याने काही वेळातच बबिताचा मृत्यू झाला. यामुळे नवापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांनी पाहणी केली.
कौटुंबिक वादाने आज पुन्हा एका निरपराध महिलेचा बळी गेल्याने विसरवाडी पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.